Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड बैठक; काय झाली...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (दि.२२ जुलै) रोजी सह्याद्री अतिथीगृहात येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल १ तास चर्चा झाली. शरद पवार हे नेहमीच राज्याच्या प्रमुखांशी चर्चा करत असतात. त्यामुळे त्यांच्या आजच्या या भेटीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे जाणून घेणार आहोत.

- Advertisement -

हे देखील वाचा : “अमित शाह भ्रष्टाचारावर बोलत होते अन् त्यांच्या पाठीमागं…”, सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीत सुरुवातीला काही औपचारिक गप्पा झाल्या. ज्यामध्ये जलसंपदा, दुधाचे दर आणि साखर कारखान्यांचे काही प्रलंबित प्रश्न यासह अनेक विषयांचा समावेश होता. त्यासोबतच विशाळगड येथील हिंसाचाराबाबत देखील दोन्ही नेत्यांमध्ये जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी आगामी सर्वपक्षीय बैठक घेण्यात यावी याबाबत प्रामुख्याने चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

हे देखील वाचा : आमदार खोसकरांकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक; म्हणाले, ‘एकनाथ शिंदे…’

तसेच मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार यांची भेट झाली.साधारणता १ तासाच्या या भेटीत १५ मिनिटे मराठा-ओबीसी आरक्षणाच्या (Maratha OBC Reservation) प्रश्नावरच एकत्रित चर्चा झाल्याचे समजते. शरद पवार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने आतापर्यंत काय प्रयत्न केले याबाबत माहिती दिली.तसेच सरकार मनोज जरांगे किंवा लक्ष्मण हाके यांना काय आश्वासन देत आहे, याबाबत विरोधी पक्षाला काहीच माहिती नसते अशी भूमिका शरद पवार यांनी याआधी घेतली होती.त्यावर देखील आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

हे देखील वाचा : “…तर फडणवीसांना अटक करा”; संजय राऊतांची मागणी

दरम्यान,या बैठकीत आगामी काही दिवसात पुन्हा सर्वपक्षीय बैठकीचे निमंत्रण विरोधकांनाही देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांना आश्वासन दिल्याचे समजते. तर दुसरीकडे विधानसभेच्या निवडणुका (Vidhansabha Election) अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेली भेट ही बऱ्याच गोष्टी अधोरेखित करत आहेत. त्यामुळे आता पुढील काळात आणखी काय राजकीय घडामोडी घडतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...