Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रजयदीप आपटेला अटक केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "या प्रकरणात…"

जयदीप आपटेला अटक केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “या प्रकरणात…”

मुंबई | Mumbai

मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अखेर शिल्पकार जयदीप आपटेला काल रात्री उशिरा अटक (Arrested) करण्यात आली. त्यानंतर त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. जयदीप आपटे (Jaydeep Apte) २६ ऑगस्टपासून म्हणजेच पुतळा पडल्याच्या दिवसापासून जयदीप आपटे फरार होता. जयदीप आपटे ४ सप्टेंबरला अटक झाली आहे. जयदीप आपटे हा कल्याणला त्याच्या आई आणि पत्नीला भेटायला आलो होता, त्यावेळी त्याला पोलिसांनी अटक केली. याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.ते माध्यमांशी संवाद साधत होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : तापाने दोन मुले हिरावली, आई-वडिलांनी १५ किमीची पायपीट करत मृतदेह खांद्यावर घेत गाठले घर

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री (CM) शिंदे म्हणाले की, जयदीप आपटेला पोलिसांनी (Police) अटक केली आहे. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल या प्रकरणात कुणालाही सुटका नाही. कायद्यासमोर सगळे सारखे आहेत. विरोधकांना आम्ही चपराक लगावली आहे. जयदीप आपटेची चौकशी केली जाईल त्याच्यावर कारवाई होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर ज्यांनी राजकारण केले तो प्रकार दुर्दैवी आहे. आम्ही आधीच सांगितले की त्याच्यावर कारवाई होईल. छत्रपती शिवरायांच्या नावाचे जे राजकारण केले ते दुर्दैवी होते, असे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : बँक व्यवस्थापकाला ४० लाखांचा गंडा

सात पथकांच्या मदतीने घेतला जयदीप आपटेचा शोध

जयदीप आपटेला शोधण्यासाठी मालवण पोलीस, ठाणे पोलीस आणि कल्याण ग्रामीण पोलिसांची (Rural Police) सात पथकं कसून शोध घेत होती. मात्र, जयदीप आपटे त्यांच्या हाती लागला नव्हता. अखेर बुधवारी संध्याकाळी जयदीप आपटे (Jaydeep Apte) स्वत:च कल्याणमधील त्याच्या घरी आला आणि अलगदपणे पोलिसांच्या तावडीत सापडला.

उद्धव ठाकरेंना गल्लोगल्ली फिरावं लागतंय

यावेळी शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, बाळासाहेब असताना मोठमोठे नेते दिल्लीपासून देशभरातून येत होते. आता यांना दिल्लीतील (Delhi) गल्ली गल्लीत जावं लागत आहे. मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा असे म्हणावे लागतं आहे. मला काही तरी करा. माझे नाव नक्की करा. ही दुर्देवी बाब आहे. बाळासाहेबांना दु:ख होत असेल. बाळासाहेबांचे विचार सोडल्यावर असं होतं. आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहोत. कल्याणकारी योजना आखत आहोत. विकास आणि कल्याण याची सांगड घालण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण आता दुर्देवी चित्र पाहत आहोत, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या