Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याआदित्य ठाकरेंनी बांधलेला पूल गेला वाहून; एकनाथ शिंदेंनी दिले 'हे' आदेश

आदित्य ठाकरेंनी बांधलेला पूल गेला वाहून; एकनाथ शिंदेंनी दिले ‘हे’ आदेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या निर्देशानुसार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) सावरपाडा (savarpada) येथे पूल बांधण्यात आला होता. मात्र तो पूल पुराच्या पाण्याने वाहून गेला. वाहून गेलेला पुलाबाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दखल घेतली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी स्वतः सावरपाडा गावातील पुलाच्या ठिकाणी गावकऱ्यांच्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी केली.

नाशिकचे माजी नगरसेवक मातोश्रीकडे रवाना

मुख्यमंत्र्यांनी पूल वाहून गेला या घटनेची गंभीरपणे दख़ल घेतली आहे. येथे तात्काळ नव्याने पूल उभारण्यात यावा, असे निर्देश त्यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

दुचाकी चोरणारी टोळी गजाआड; दहा मोटरसायकल जप्त

सावरपाडा येथील पूल, रस्ते, पिण्याचे पाणी आदी समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली आहे. पुढील काही दिवसांत गावांत सकारात्मक बदल दिसतील, असे आश्वासन मंगेश चिवटे यांनी गावकऱ्यांना दिले आहे.

दारणा धरणातून ‘इतक्या’ क्युसेसचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उत्तर महाराष्ट्र समनव्यक योगेश म्हस्के यांच्यासह नायब तहसीलदार, बांधकाम विभागाचे अभियंता व अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या