Thursday, May 2, 2024
Homeनाशिकमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशकात दाखल; केली 'ही' मोठी घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशकात दाखल; केली ‘ही’ मोठी घोषणा

नाशिक | Nashik

आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव (Mundhegaon) येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत (Jindal Polyfilm Company)भीषण आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर या कंपनीत २५ हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.

- Advertisement -

त्यानंतर अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) मदतीने १७ जणांना बाहेर काढण्यात आले होते. त्यावेळी या आगीत १४ जण गंभीर जखमी झाले होते. त्यातील ११ रुग्णांना सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर काहीना इतर रुग्णालयांत दाखल करण्यात आले. यानंतर काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) नाशकात (Nashik) दाखल झाले असून त्यांनी सुयश हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची (Injured) विचारपूस केली.

यावेळी माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, झालेली दुर्घटना ही दुर्दैवी असून मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख तर जखमींच्या उपचाराचा रुग्णालयांचा संपूर्ण खर्च सरकार करेल. तसेच डॉक्टरांना जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी (inquiry) केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, रुग्णालयात दाखल जखमींची विचारपुस केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इगतपुरीकडे (Igatpuri) रवाना झाले असून ते जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत जाऊन घटनास्थळाची पाहणी (Inspection) करणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या