Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याMumbai Rain : पहिल्याच पावसात मुंबईची झाली तुंबई; मुख्यमंत्र्यांकडून कामांची पाहणी, म्हणाले...

Mumbai Rain : पहिल्याच पावसात मुंबईची झाली तुंबई; मुख्यमंत्र्यांकडून कामांची पाहणी, म्हणाले…

मुंबई | Mumbai

कालपासून मुंबईत (Mumbai) मुसळधार पाऊस (Rain) कोसळत असून पहिल्याच पावसामुळे मुंबईत जागोजागी पाणी साचल्याने ‘मुंबईची तुंबई’ झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पहिल्या पावसामुळे मुंबईतील मिलन सब-वेमसह किंग्स सर्कल, कोस्टल रोड भागात पाणी साचल्याने वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज सकाळी मिलन सब-वेसह कोस्टल रोडची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला…

- Advertisement -

Mumbai Rain : मुंबईला पहिल्याच पावसाने झोडपले; जागोजागी साचले पाणी

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज सकाळपासून मी मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसाची पाहणी करत आहे. सुरुवातीला मी वरळी कोस्टल रोडची (Worli Coastal Road) पाहणी केली. त्या ठिकाणी काम कुठपर्यंत आले आहे. दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होत आहे का? हे बघितले. तसेच या ठिकाणी दरवर्षी पाणी साचल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत होती. मात्र आता दिलेल्या सूचनांची पूर्तता केल्यानंतर वाहतूक सुरळीतरित्या सुरू आहे. ज्या ठिकाणी कामाची योग्य अंमलबजावणी होणार नाही त्या ठिकाणी निश्चित कारवाई करू मात्र प्रत्यक्षदर्शी तशी कुठलीही गोष्ट निदर्शनास आलेली नाही. त्यामुळे कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे शिंदेंनी म्हटले.

Video : पुन्हा एकदा रेल्वे अपघात! एका मालगाडीची दुसऱ्या मालगाडीला धडक, १२ डब्बे रुळावरून घसरले

पुढे ते म्हणाले की, मिलन सब-वेमध्ये (Milan Subway) लावलेली यंत्रणा काम करत आहे का? हे पाहायला मी आज आलो आहे. मिलन सब-वेमधली वाहतूक (Transportation) चालू आहे. सब-वेमध्ये पाणी साचल्यानंतर ते पाणी पंपिंगने बाजूच्या नाल्यात सोडले जाते. त्यानंतर ते पाणी तिथून थेट मोठ्या टँकमध्ये सोडले जाते. अशी यंत्रणा येथे लावण्यात आली आहे. फ्लडगेटही लावले आहेत. त्यामुळे भरती येईल तेव्हा फ्लडगेटमुळे पाणी आत येणार नाही”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Jayant Patil : जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार? भाजपने व्हिडिओ शेअर करत सांगितले १० कारणे

- Advertisment -

ताज्या बातम्या