मुंबई | Mumbai
आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) निमित्ताने वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागलेली असते. त्यामुळे दरवर्षी लाखो वारकरी न चुकता पायी वारी करत असतात. तसेच संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्याही पंढरपूरला जातात. वारकऱ्यांचा हा उत्साह बघण्यासारखा आणि अनुभवण्यासारखा असतो. यावेळी आषाढीच्या दिवशी विठ्ठलाची महापूजा करण्यात येते. ही महापूजा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात येते.त्यामुळे दरवर्षी पंढरपूर येथील मंदिर समितीतर्फे मुख्यमंत्र्यांना पूजेचे निमंत्रण देण्यात येते.याच पार्श्वभूमीवर यावर्षी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मंदिर समितीच्या वतीने महापुजेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे.
हे देखील वाचा : Maharashtra Politics : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर; इच्छुकांचा हिरमोड
येत्या १७ जुलै रोजी पंढरपुरात (Pandharpur) आषाढी यात्रेचा सोहळा पार पडणार असून या यात्रेतील शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांना मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औसेकर महाराजांच्या हस्ते विणा, वाकरी पटका, श्रींची मुर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अजित पवार (Ajit Pawar) ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचाही मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे २.२० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेची शासकीय महापूजा होणार आहे.
हे देखील वाचा : मोठी बातमी! लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड
दरम्यान, त्यासोबतच पंढरपुरातील विठुरायाचे दर्शन आता भाविकांना २४ तास घेता येणार आहे.आषाढी यात्रेनिमित्त येत्या ७ जुलैपासून श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेचे दर्शन २४ तास सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर समितीच्यावतीने देण्यात आली आहे.आषाढी यात्रा नियोजनासंदर्भात पंढरपुरात मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे आता भाविकांना आषाढी वारीच्या आधीच विठुरायाचे दर्शन घेता येणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा