Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजहा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायम उभा राहणार - मुख्यमंत्री शिंदे

हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायम उभा राहणार – मुख्यमंत्री शिंदे

लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार

नाशिक | प्रतिनिधी Nasik

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुतीला मिळालेल्या मोठ्या यशा नंतर आज संध्याकाळी लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवास स्थानी दाखल होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे औक्षण करून अभिनंदन करत एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे सांगण्यात आले.या वेळी नीलम गोऱ्हे यांच्या समवेत मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.

- Advertisement -

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व लाडक्या बहिणींचे अभिनंदन करून आभार मानले, त्याच बरोबर हा लाडका भाऊ सदैव आपल्या पाठीशी उभा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले असून त्याच बरोबर लाडकी बहिण योजनेचे १५०० रुपयांवरून २१०० रुपये देण्याचा निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राज्यात लाडक्या बहिणींनी इतिहास घडविला आहे.लाडकी बहिण योजना सर्वात लोकप्रिय ठरली असून बहिणींमुळे विरोधकांना धडकी भरली व त्यामुळे निवडणुकीत विरोधी पक्षाला धूळ चारली गेली आहे. या वेळी लाडक्या बहिणीसाठी सुरु करण्यात आलेल्या योजनाबद्दल सांगत त्यांनी राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचे आभार मानले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...