Saturday, April 26, 2025
Homeमहाराष्ट्र"बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे..."; मुख्यमंत्र्यांनी घातले...

“बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे…”; मुख्यमंत्र्यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे

पंढरपूर | Pandhrpur

आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याहस्ते पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात विठ्ठलाची शासकीय पूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी “हे बा… विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर करण्याचे साकडे विठ्ठलाच्या चरणी घातले. तसेच गेली तीन वर्षे ज्या प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली. त्याच जोमाने अधिक काम करण्याचे बळ मिळावे”, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

हे देखील वाचा : ‘लाडकी बहिण’नंतर आता लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा मिळणार ‘इतकी’ रक्कम

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हे सरकार सर्वसामान्याचे आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आजच्या दिवशी पांडुरंगाला (Pandurang) एकच प्रार्थना आहे की राज्यातील शेतकरी, कामगार व कष्टकरी सुखी झाला पाहिजे. यासाठी हे शासन सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मोफत तीन गॅस सिलेंडर योजना, बेरोजगार तरुणांसाठी अप्रेंटिस योजना आदी योजनेच्या माध्यमातून शासन सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Ashadhi Ekadashi : नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्याला मिळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत विठ्ठलाच्या महापूजेचा मान!

मागील आषाढी वारीच्या तुलनेत यावर्षी २५ ते ३० टक्के वारकरी संख्या वाढलेली दिसत आहे त्यामुळे सर्वत्र एक भक्तीमय वातावरण झालेले आहे. वारकरी संप्रदाय भागवत धर्माची पताका सदैव फडकवत ठेवत असून अशा वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी शासन सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे. शासनाने वारकरी महामंडळाची स्थापना केली असून वारीतील दिंड्यांना अनुदान देण्यात आलेले आहे. जिल्हा प्रशासनाला आषाढी वारीनिमित्त देण्यात येणाऱ्या निधीमध्ये तिपटीने वाढ केली आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सर्वांच्या संमतीनेच केला जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

हे देखील वाचा : शरद पवार नाशकातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार?

तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनासाठी ७३ कोटी ८० लाखाचा निधी मंजूर केला आहे. याअंतर्गत सुरू असलेली सर्व कामे उत्कृष्ट असून मंदिराला पूर्वीचे वैभव प्राप्त होत आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत ही तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबवण्यासाठी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीने तयार केलेल्या १०३ कोटीच्या आराखड्याला मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मंदिर समितीचा एमटीडीसीसोबत असलेला करार पुढेही वाढविण्यात येईल. तसेच भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याप्रमाणे मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या सर्व अडीअडचणी सकारात्मक दृष्टीने सोडवण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा : “महाराष्ट्रात जातीपातीचं विष इतकं खोलवर रुजत चाललं की…”, राज ठाकरेंनी विठुरायाकडे व्यक्त केली खंत

आषाढी वारीनिमित्त (Aashadhi Wari) आरोग्य विभागाच्या वतीने चार ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले असून आतापर्यंत ८ लाख नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून, १५ लाख नागरिक या आरोग्य सुविधांचा लाभ घेतील, अशी अपेक्षा आहे. तसेच पंढरपूर येथे देश विदेशातून लाखो वारकरी भाविक येतात त्यांच्यासाठी आरोग्य सुविधांबाबत कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी लवकरच १ हजार बेड क्षमता असलेले नवीन रुग्णालय बांधण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : मनपा सेवक, एजंटाच्या घरावर ईडीचे छापे; बनावट जन्मदाखल्याप्रकरणी...

0
मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांना बनावट कागदात्रांच्या आधारे जन्मदाखले दिल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात (Case) आज ईडीच्या (ED) पथकाने शहरात महानगरपालिकेत (NMC) जन्ममृत्यू विभागात...