Tuesday, March 25, 2025
Homeराजकीयअ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन येणारच; ठाकरेंवरील हल्ल्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया

अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन येणारच; ठाकरेंवरील हल्ल्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया

मुंबई । Mumbai

काल (दि.१०) ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. मात्र त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. याचे राजकीय वर्तुळामध्ये परिमाण दिसून येत असून विविध नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शेण, नारळ आणि बांगड्या फेकण्यात आल्या. यामुळे शिवसैनिक प्रचंड नाराज आहेत. या संदर्भात आता शिंदे गटाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना ही ॲक्शनला रिॲक्शन असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. खरी सुरुवात ही राज ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये झाली. मराठवाड्यात राज ठाकरेंचा ताफा अडवला गेला. त्याच ॲक्शनला आज रिअ‍ॅक्शन दिल्याचे आज पाहायला मिळालं, परंतू, असं आंदोलन कोणालाच अपेक्षीत नसते असंही मुख्यमंत्री म्हणाले.

हे ही वाचा : “तुमचा हिरवा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही”; बावनकुळेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

सरकार स्थापन झाल्यावर विरोधक म्हणाले हे सरकार घटनाबाह्य आहे, हे सरकार पडणार आहे. परंतू, असं झालं नाही. सरकार अधिक मजबूत होत गेलं. आम्ही बाळासाहेब यांचे विचार कधीही सोडले नाहीत असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना अशा प्रकारचा सामना करावा लागतो असा टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना लगावला. सत्तेसाठी कुठलंही कॉम्प्रमाईज आम्ही विचारांशी करणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे असं ते म्हणाले.

मातोश्री सोडून दिल्लीला लोटांगण

आज झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्ट्राईकरेट पाहिला तर लोकांची पसंती कोणाला आहेत ते पाहावं. ठाण्यातल्या लोकांना बरोबर औषध द्यायला सांगतो असे मुख्यमंत्री म्हणाले. हे लोक आम्हाला दिल्लीतलं सांगतात. आधी दिल्लीतली लोकं मातोश्रीमध्ये यायची आणि हे लोक आता मातोश्री सोडून दिल्लीला लोटांगण घालत असल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. आम्ही दिल्लीला जातो ते राज्यातील विकासासाठी जातो. आम्ही कुठलंही काम लपून-छपून करत नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून आम्ही दिल्लीला जात नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले.

हे ही वाचा : सुप्रिया सुळेंचा मोबाईल, व्हॉट्सअप हॅक; केले ‘हे’ आवाहन

बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना जंगलात फोटोग्राफी करण्यासाठी पाठवलं असतं

आता अनेक लोक बोलत फिरत आहेत की, मला मुख्यमंत्री करा. पण आम्ही तसं कधीच केलं नाही. मुख्यमंत्रीपदासाठी कधीही विचारांशी गद्दारी केली नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. आजही ते ठाण्यातून दाढी बद्दल बोलले. परंतू, त्यांना दाढीची धास्ती आहे. त्यांना माहिती आहे याच दाढीने आपली गाडी खड्ड्यात घातलेली आहे. मिमिक्री करणं हेच काम त्यांना आता उरलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी अशा प्रकारचं काम केलं असतं तर बाळासाहेबांनी त्यांना जंगलात फोटोग्राफी करण्यासाठी पाठवलं असतं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा : Hindenburg Report च्या आरोपांवर सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच काय म्हणाल्या?

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...