Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसुप्रिया सुळेंचा मोबाईल, व्हॉट्सअप हॅक; केले 'हे' आवाहन

सुप्रिया सुळेंचा मोबाईल, व्हॉट्सअप हॅक; केले ‘हे’ आवाहन

मुंबई । Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP SP) विद्यमान खासदार आणि कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा फोन हॅक (Mobile Hack) झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वतः एक्स अकाऊंटवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharastra Politics) खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

रविवारी दुपारी एकच्या सुमारास सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून अत्यंत महत्त्वाचे असे म्हणत फोन हॅक झाल्याची माहिती दिली. ‘माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी’, अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

दौंडमधील शिवस्वराज्य यात्रेदरम्यान फोन हॅक झाल्याचं सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आल्याची माहिती मिळतेय. व्हॉटस्अप असून देखील शेजारीच बसलेल्या जयंत पाटलांना सुप्रिया सुळे यांच्या फोनवरून मेसे. ज आला होता. त्यावरून सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आलं की, त्यांचा फोन हॅक झालाय. त्यांनी तात्काळ पोलिसांना बोलवून याबद्दल सांगितलं

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...