Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्यापालकमंत्र्यांची लवकरच नियुक्ती; मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच

पालकमंत्र्यांची लवकरच नियुक्ती; मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच

मुंबई । Mumbai

राज्यात शिंदे – फडणवीस सरकार (Shinde – Fadnavis Government) स्थापन होऊन १५ दिवस उलटले असून अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of Cabinet) झालेला नाही. त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. आता यावर खुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे….

- Advertisement -

यावेळी शिंदे म्हणाले की, मंत्रिमंडळ नसले तरी कामे थांबलेली नाही. लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, विरोधकांना जे वाटत आहे, तसे काही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, विरोधकांची लाईन ही डेड झाली आहे, त्यांना डेडलाईन हवी आहे, तर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे त्यांनी सांगितले.

तसेच शिंदे पुढे म्हणाले की, संजय राऊत (Sanjay Raut) काय बोलतात यावर मला बोलण्याची गरज नाही. रोज सकाळी उठून तेच काम करत असतात. राज्यात पूर परिस्थिती (Flood conditions) निर्माण झाली आहे, त्यासाठी आम्ही पाहणी करत आहोत. शेजारी राज्यांशी आम्ही बोलत आहोत. कुणी पुरात अडकू नये, याची खबरदारी घेण्यासाठी आम्ही काम करत आहोत. पेट्रोल-डिझेलचे (Petrol – Diesel) दर आम्ही कमी केले आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना कर्ज सवलत दिली जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत शिंदे – फडणवीस सरकारने औरंगाबादसह (Aurangabad) उस्मानाबाद (Osmanabad) व नवी मुंबईतील (Navi Mumbai) आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसोबतच एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वत मान्यता देण्यात आली असून पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या