Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रएकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा

एकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा

मुंबई –

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकेल या दृष्टीनं आतापासूनच तयारीला लागा असे आदेश

- Advertisement -

पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल रात्री व्हिडीओ कॉन्फरंसच्या माध्यमातून जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. रात्री 10 वाजता सुरू झालेली ही बैठक मध्यरात्री 1 वाजेपर्यंत चालली. यावेळी दसरा मेळाव्यात मांडलेल्या भूमिकेबद्दल शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी उद्धव ठाकरे यांचं जोरदार अभिनंदन केलं.

यंदा कोव्हिडच्या काळात राज्य सरकारकडं निधीची कमतरता असली तरी पुढच्या वर्षी जिल्ह्यांना विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिलं.

सीएम ठाकरेंनी सांगितलं की, कोव्हिडच्या काळात सरकार आपलं काम करत आहे. परंतु पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा अशा सूचनाही त्यांनी जिल्हाप्रमुखांना दिल्या. टीकाकारांना टीका करू द्या तुम्ही तुमचं कम करत रहा असा सल्लाही ठाकरे यांनी यावेळी दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या