Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशCoal and power crisis: कोळशाचा भार ग्राहकावर?

Coal and power crisis: कोळशाचा भार ग्राहकावर?

नवी दिल्ली | New Delhi

महाराष्ट्रासह देशांतर्गत कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज संकट अधिक गडद होण्याची चिन्हे असून वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळशाची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाल्याने वीज केंद्रे ठप्प पडण्याच्या मार्गावर आहेत. (Coal and power crisis)

- Advertisement -

दरम्यान, उर्जा मंत्रालयाने उच्च किंमतीच्या आयात कोळशाचा भार ग्राहकांवर टाकण्यासाठी समर्थन दिले आहे. म्हणजे येत्या काळात वीज आणखी महाग होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोळशाचा तुटवडा आहे.

पांढरी साडी अन् साधा भोळा अंदाज, पाहा ‘आर्ची’चे खास फोटो

ऊर्जा मंत्रालयाचे सचिव आलोक कुमार (Alok Kumar) यांनी सांगितले की, डिसेंबर २०२२ पर्यंत काही कोळशावर आधारित वीज प्रकल्पांसाठी आयात केलेल्या कोळशाची उच्च किंमत ग्राहकांनी देण्याचे मान्य करण्यात आले आहे. ते म्हणाले की आयात केलेले कोळसा आधारित वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालले नाहीत तर विजेच्या वाढत्या मागणीमुळे देशांतर्गत कोळशावर आधारित युनिट्सवर दबाव येईल.

दरम्यान, अदानी समूह, टाटा पॉवर आणि एस्सार यांसारख्या आयातित कोळशावर आधारित युनिट्स वीज निर्मिती करून राज्य वितरण कंपन्यांना विकण्यास सक्षम असल्याने या निर्णयामुळे विजेची उपलब्धता वाढण्यास मदत होईल.

Hina Rabbani Khar : ब्युटी विथ ब्रेन! शाहबाज सरकारच्या राज्यमंत्री ‘हिना रब्बानी खार’ चर्चेत

तसेच, या महिन्याच्या सुरुवातीला ऊर्जा मंत्री आर के सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत एस्सारचा १,२०० मेगावॅटचा सलाया प्लांट आणि अदानीचा १,९८० मेगावॅटचा मुंद्रा येथील प्लांट यांचा समावेश करताना आयात केलेल्या कोळशाचा उच्च खर्च ग्राहकांवर टाकण्यावर सहमती दर्शविली होती.

महाराष्ट्र राज्यामध्ये विजेची टंचाई निर्माण झाली असली तरी महाजेनको कंपनीतर्फे ८ हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे नियोजन करण्यात आल्याचा दावा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केला आहे. वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ऊर्जामंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. खुल्या बाजारातून वीज खरेदीसाठी उर्जा खात्यास खेळत्या भांडवलाची गरज आहे. त्यामुळं ग्रामविकास व नगरविकास खात्यांकडील अनुदानाच्या थकबाकीसह २ हजार कोटींचा निधी ऊर्जा खात्यास उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी डॉ. राऊत यांनी बैठकीत केली आहे.

आलिया-रणबीरच्या विवाहसोहळ्याचे फोटो पाहिलेत का?

- Advertisment -

ताज्या बातम्या