Monday, July 22, 2024
Homeनाशिकराज्यात पारा घसरल्याने पुन्हा थंडी; निफाड @८.५ अंश

राज्यात पारा घसरल्याने पुन्हा थंडी; निफाड @८.५ अंश

नाशिक । Nashik

- Advertisement -

उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू असल्याने आलेल्या शितलहरीचा प्रकोप महाराष्ट्रात जाणवत असुन यामुळे मराठवाडा, विदर्भ व मध्य महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे.

राज्यात किमान तापमान 7 ते 8 अंशावर येऊन ठेपले आहे. तीन दिवसापुर्वी नाशिक जिल्ह्यातील पार 12.2 अंशावर असतांना आज पारा 8.4 अंशावर खाली आला आहे. निफाडचा पारा आज 8.2 अंशापर्यत खाली आला. जिल्ह्यातील पार्‍याची घसरण सुरु असुन मागील वर्षाप्रमाणे 31 डिसेंबरपर्यत पारा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे.

जम्मु काश्मिर पासुन उत्तराखंड पर्यत उत्तरेत बर्फवृष्टी सुरु आहे. यामुळे निर्माण झालेल्या शितलहरीचा प्रकोप शेजारील राज्यांना जशवत आहे. परिणामी राज्यात विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान 7 ते 8 अशांपर्यत खाली आले आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिकला आज किमान तापमान 8.4 अंशापर्यत खाली आला असुन निफाड याठिकाणी 6.5 अंश यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. पुढच्या आठवड्यात थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

राज्यातील आजचे किमान तापमना

* परभणी – 7.6 अंश सेल्सी.

* गोंदिया – 7.8 अंश सेल्सी

* पुणे – 8.1 अंश

* नाशिक – 8.4 अंश

* नागपुर – 8.9 अंश

* जळगांव – 9.0 अंश

* औरंगाबाद – 9.2 अंश

* मालेगांव – 10.2 अंश

- Advertisment -

ताज्या बातम्या