Tuesday, May 7, 2024
Homeमुख्य बातम्याथंडीचा जोर वाढला; निफाडचा पारा 8.1 अंशावर

थंडीचा जोर वाढला; निफाडचा पारा 8.1 अंशावर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकसह राज्यभर थंडीचा ( Winter )जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान घसरले आहे. महाबळेश्वरात तापमान 10.4 अंशांवर पोहोचले आहे तेवढेेच तापमान नाशिकचे असल्याने नाशिककरांना आता महाबळेश्वरचा अनुभव घरबसल्या घेता येत आहे. निफाडमध्ये तर कालचक्क 8.1 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

- Advertisement -

नाशिकचे तापमान काल पुन्हा एक अंशाने घसरले.धुळ्यातही तापमानात घट होऊन ते 8.2 अंशांवर पोहोचले आहे. नाशिकमध्येही हुडहुडी भरली आहे. रब्बी पिकांना पोषक थंडी पडल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.मात्र द्राक्ष उत्पादकांचे धाबे दणाणले आहे.ग्रामीण भागात सर्वत्र शेकोट्या पेटवून थंडीपासून संंरक्षण केले जात आहे.

नाशिकचे किमान तापमान आज 10.4 अंश सेल्सीअस होते.नाशिकमध्ये थंडीचे आगमन थोडे उशीराच झालें. पावसाळ्या प्रमाणेच थंंडीही यंदा जोरात राहणार आहे.गेल्या काही दिवसांपासून पारा सातत्याने खाली उतरत आहे.नाशिकचे तापमान तीन दिवसांत 13 अंश सेल्सिअसवरून 10.4 अंशापर्यंत खाली घसरले आहे. निफाडमध्ये तर आज चक्क 8.1 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या