Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्यात थंडीचा जोर वाढणार; जळगावला थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती

राज्यात थंडीचा जोर वाढणार; जळगावला थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

महाराष्ट्रात शनिवारी (दि.८) १०.८ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवून  पहिल्या थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती जळगाव ने अनुभवली आहे. हे किमान तापमान, सरासरीपेक्षा  पाच डिग्रीने खाली नोंदवले गेले आहे. जळगावचे कमाल तापमानही शनिवारी ३०.८ अंश सेल्सिअस नोंदवून सरासरीच्या २.७ अंश सेल्सिअसने हे तापमान खालावलेले आहे.

YouTube video player

थंडी वाढणार
रविवार (दि.९ नोव्हेंबरपासून नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर व उत्तर अहिल्या नगर अशा सहा जिल्ह्यांत  सरासरीपेक्षा २ ते ४ अंश सेल्सिअसने तर विदर्भात २ अंश सेल्सिअसने किमान तापमान खालावून सप्ताहभर म्हणजे शनिवार दि. १४ नोव्हेंबरपर्यंत चांगल्या थंडीची शक्यता जाणवते, असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : कट चहा ५, कॉफी १२ तर मिसळपाव ‘इतक्या’...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणूक (Nashik Municipal Corporation) २०२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने स्थानिक प्रचलित दरांची यादी...