Thursday, May 2, 2024
Homeनगरआणखी आठ मेंढ्या दगावल्या

आणखी आठ मेंढ्या दगावल्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि थंडीमुळे 864 शेळ्या आणि मेंढ्या मृत पावलेल्या आहेत. यामुळे पशूपालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. शनिवारी राहुरी तालुक्यात आणखी 8 मेंढ्या दगावाल्या असून एकूण मृतांची संख्या आता 872 झाली असून राज्य सरकारकडून देण्यात येणार्‍या नुकसान भरपाईच्या नियमात थंडीच्या लाटेचा समावेश नसल्याने राज्य सरकारने नियमात बदल केल्यास नुकसानग्रस्त पशूपालकांना मदत करता येणे शक्य होणार आहे.

- Advertisement -

नगरसह राज्यात 1 डिसेंबरपासून गारठा आणि संततधार आवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे नगर जिल्ह्यातील पारनेर, संगमेनर, नगर, श्रीगोंदा, अकोले आणि कर्जत तालुक्यात 864 शेळ्या आणि मेंढ्या मृत पावल्या आहेत. राज्यात ही संख्या हजारोंच्या घरात असून सर्वात शेळ्या आणि मेंढ्या पुणे जिल्ह्यात मृत पावलेल्या आहेत. शनिवारी राहुरी तालुक्यात आणखी 8 मेंढ्या मृत पावल्याची माहिती राज्य सरकारच्या पशूसंवर्धन विभागाच्यावतीने देण्यात आली. मात्र, राज्य सरकारच्या नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाईच्या नियमात शीत लहर (थंडीची लाट) चा समावेश नाही. यामुळे पशूसंवर्धन विभागामार्फत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना थेट मदत देता येणे शक्य नसल्याचे पशूसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले असून आता राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे पशूपालकांचे लक्ष लागले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या