Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यागारवा वाढणार, 'या' भागात जाणवेल प्रभाव

गारवा वाढणार, ‘या’ भागात जाणवेल प्रभाव

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

मुंबईसह कोकण वगळता गुरुवार (दि.१६) पर्यंत उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा किमान तापमानात घट होऊन काहीशी थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

नाशिकसह (Nashik) खानदेशातील (Khandesh) सर्व जिल्ह्यात ताशी १५-२० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे (Blowing winds) हवेतील गारवा तेथे अधिक जाणवू शकतो, असा अंदाज निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी वर्तविला आहे.

 मध्य महाराष्ट्रातील (Madhya Maharashtra) १० जिल्ह्यापेक्षा मराठवाडा (Marathwada) व विदर्भात कदाचित ह्या थंडीचा प्रभाव काहीसा अधिकही जाणवू शकतो. त्यामुळे दुपारचे कमाल तापमान सरासरी किंवा काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक राहून महाराष्ट्रात दिवसाचे वातावरणातील (atmosphere) ऊबदारपणा हा अजुनही जाणवणारच आहे.

शुक्रवार दि.१७ पासुन थंडी काही दिवसासाठी जरी काहीशी कमी भासली तरी महाराष्ट्रात अजुनही लघु दिवसांच्या कालावधीचे थंडीचे आवर्तने अवतरतीलच. उत्तर भारतात एकापाठोपाठ पाठलाग करणारी पश्चिम झंजावाताची साखळी चालूच आहे. त्यामुळे भले तीव्रता कमी जाणवली तरी शेत पिकासाठी फायद्याची थंडी (cold) महाराष्ट्राला मिळणारच आहे. तेव्हा थंडी गेली असे समजू नये.

निरभ्र आकाश (clear sky) व स्वच्छ सूर्यप्रकाश सहित आल्हाददायक थंडीचे वातावरण सध्या जाणवणार असून पाऊस अथवा गारपीटीची कोणतीही शक्यता सध्या तरी महाराष्ट्रात नाही. काही ठिकाणी कांदा, द्राक्ष, गहू हरबऱ्यावरील काहीसा जाणवलेला बुरशी, मावा, किडीचा प्रादुर्भाव येणारे वातावरणच प्रतिबंध करील, असे वाटते. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकंदरीत कोणतीही धास्ती मनी बाळगू नये, असा सल्लाही माणिकराव खुळे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या