Saturday, June 7, 2025
HomeनगरPathardi : शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा

Pathardi : शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची पाथर्डीत आढावा बैठक

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

केंद्र आणि राज्य शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सर्वसामान्य नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी अधिकार्‍यांना दिली. नव्याने जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारलेले डॉ.पंकज आशिया बुधवारी (दि.4) पाथर्डी तालुक्याच्या दौर्‍यावर होते. त्यांनी विविध शासकीय विभागांची आढावा बैठक घेतली. पाथर्डी तहसील कार्यालयात झालेल्या या बैठकीत त्यांनी महसूल, पोलिस, सार्वजनिक बांधकाम, नगरपरिषद, भूमिअभिलेख, कृषी, पंचायत समिती आदी विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला.

- Advertisement -

यावेळी प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक तसेच इतर खात्यांचे प्रमुख अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व खात्यांचे काम स्वतंत्रपणे तपासून अधिकार्‍यांशी थेट संवाद साधण्यात आला. जिल्हाधिकारी आशिया यांनी ई-हक्क प्रणाली, प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत योजना, स्वच्छ भारत मिशन यासारख्या महत्त्वाच्या योजनांची प्रगती जाणून घेतली. यावेळी त्यांनी अंमलबजावणीमध्ये येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना स्पष्ट सूचना दिल्या.

जिल्हाधिकार्‍यांनी पाथर्डी नगरपरिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीची पाहणी करून मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्याकडून कामकाजाची माहिती घेतली आणि आवश्यक सूचना केल्या. पुढील बैठकीत याच योजनांच्या प्रगतीचा आढावा घेऊन कार्यपद्धतीत सुधारणा सुचवण्यात येतील, असे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सांगितले.

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण होणार
जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामेही जवळजवळ पूर्ण झाल्याचे सांगितले. उर्वरित 20 टक्के पंचनामे पुढील दोन दिवसांत पूर्ण करून शासनाकडे अनुदानासाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या दौर्‍याने पाथर्डी तालुक्यातील प्रशासकीय कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

YouTube video player

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Corona Virus : सावधान! करोना वाढवतोय टेन्शन; भारतात रुग्णांची संख्या ५०००...

0
दिल्ली । Delhi भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. शुक्रवारी (६ जून) देशभरात ५,००० हून अधिक सक्रिय रुग्णांची नोंद...