Sunday, April 27, 2025
Homeनगरमहाविद्यालयात पोलीसांची झाडाझडती; टवाळखोरांना कारवाईचा इशारा

महाविद्यालयात पोलीसांची झाडाझडती; टवाळखोरांना कारवाईचा इशारा

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी येथील स्व. रामदास पाटील धुमाळ कला, वाणिज्य महाविद्यालयामध्ये सकाळच्या दरम्यान राहुरी पोलीस (Rahuri Police) पथकाने अचानक जाऊन झाडझडती घेतली. महाविद्यालयात विना ओळखपत्र असणार्‍या तरुणांना ताब्यात घेत कसुन चौकशी केली. काही विद्यार्थी संशयितरित्या आढळून आल्याने पोलिसांनी (Police) सदर विद्यार्थी आणि त्याच्या नातेवाईकांची चांगलीच कान उघडणी केली आहे. सदर कारवाईने मात्र, टारगट तसेच महाविद्यालय परिसरामध्ये गैरकृत्य करणार्‍यांना चांगलाच चाप बसला आहे.

- Advertisement -

दिवसेंदिवस शाळा-महाविद्यालयामध्ये मुलींबाबत गैरकृत्य घडत असल्याच्या घटना समोर येत आहे. त्या अनुषंगाने आता पोलिसांनी खबरदारी घेत तालुक्यातील शाळा तसेच महाविद्यालयामध्ये अचानक भेटी देत तेथील चौकशी करणे सुरू केले आहे. पोलीस पथकाने राहुरी (Rahuri) महाविद्यालयात धाव घेतली. या दरम्यान काही टारगट तरुण देखील पोलिसांना आढळून आले. त्यांची देखील चौकशी पोलिसांनी केली असून त्यांच्या पालकांना बोलवून योग्य त्या सूचना दिल्या.

सदर कारवाईने मात्र महाविद्यालय परिसरात चांगलाच धाक निर्माण झाला आहे. अचानक अशा होणार्‍या कारवाईंचे पालक पालक वर्गातून स्वागत केले जात आहे. कुठल्याही विद्यार्थिनींना (Student) टारगट मुलांचा त्रास होत असेल तसेच काही अडचणी असल्यास पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन राहुरी पोलीसांनी केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...