Saturday, May 9, 2026
Homeदेश विदेशTVK Vijay: विजय राज्यपालांना दुसऱ्यांदा भेटले, पण रिकाम्या हाती परतले; सत्तास्थापनेआधी तामिळनाडूत...

TVK Vijay: विजय राज्यपालांना दुसऱ्यांदा भेटले, पण रिकाम्या हाती परतले; सत्तास्थापनेआधी तामिळनाडूत पेच

तामिळनाडू | Tamil Nadu
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या ‘तामिळी वेत्री कळघम’चे ( TVK ) प्रमुख विजय यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी गुरूवारी किंवा शुक्रवारी घेण्याचे नियोजन होते. त्यासाठी बुधवारी विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली होती. परंतु, बुधवारी सरकार स्थापनेचे निमंत्रण देण्यापूर्वी पक्षाने पाठिंब्याबाबतचे पुरावे द्यावेत, असे राज्यपालांनी सांगितले होते. पण, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी डाव टाकत विजय आणि टीव्हीके पक्षाची कोंडी केली.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत वादळी यश मिळवूनही सुपरस्टार आणि टीव्हीके (TVK) प्रमुख विजय थलापती यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग तूर्तास खडतर झाला आहे. गुरुवारी किंवा शुक्रवारी दिमाखात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या तयारीत असलेल्या विजय यांना राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी कायदेशीर पेच टाकत मोठा झटका दिला आहे.

- Advertisement -

मागील १० वर्षांपासून काँग्रेस आणि डीएमके एकत्र निवडणूक लढवत आहे. मात्र यंदा ही आघाडी निकालानंतर तुटली आहे. काँग्रेसने टीव्हीकेला सरकार बनवण्यासाठी पाठिंबा दिला आहे. यामुळे टीव्हीकेचे संख्याबळ वाढले असले तरी बहुमतापासून ते अजूनही दूर आहे. त्यासाठी डाव्या पक्षांशी संपर्क साधला जात आहे. आज विजय यांनी पुन्हा एकदा राज्यपाल आर्लेकर यांची भेट घेतली. तेव्हा, बहुमतासाठी लागणार आकडा घेऊनच माझ्याकडे या, असे राज्यपालांनी विजय यांना सांगितले.

राज्यपाल भेटीत काय घडलं?
बुधवारी विजय यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला होता. मात्र, राज्यपालांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आधी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११८ आमदारांच्या पाठिंब्याचे अधिकृत पत्र द्या, त्यानंतरच सत्तास्थापनेचा विचार केला जाईल.” राज्यपालांच्या या भूमिकेमुळे विजय यांच्यासमोर नवा पेच निर्माण झाला.

राज्यपाल आर्लेकर यांनी विजय यांच्यासमोर ठेवलेल्या अटीमुळे पेच निर्माण झाला असून संख्याबळ जुळवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

‘व्हिसीके’चे प्रमुख थोल थिरूमवलवन यांनी राज्यपाल आर्लेकर यांना विनंती केली की, विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करावे. त्यासह विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची संधी द्यावी.

तामिळनाडू विधानसभेचे एकूण संख्याबळ २३४ असून सत्तेसाठी ११८ आमदारांची गरज आहे. विजय हे दोन जागांवरून विजयी झाले आहेत. त्यामुळे टीव्हीकेचे संख्याबळ १०८ ऐवजी १०७ इतकं गृहीत धरले जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसने आपल्या ५आमदारांचा पाठिंबा विजय यांना जाहीर केला आहे. मात्र, तरीदेखील विजय यांना बहुमतासाठी आणखी काही आमदारांची गरज आहे.

TVK: सुपरस्टार विजय सरकार स्थापन करणार, पण…आरबीआयकडे मागितला मदतीचा हात, नेमकं कारण काय?

राज्यपालांच्या भूमिकेवर शंका
राज्यपाल जाणुनबुजून सर्वात मोठा पक्ष असलेल्या टीव्हीकेला सरकार बनवण्यासाठी निमंत्रण देत नाहीत का असा प्रश्न उभा राहिला आहे. टीव्हीकेच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन बनवण्यासाठी अनेक पर्याय आहेत. यापैकी एक म्हणजे इतर पक्षांचा पाठिंबा मिळवणे, केवळ काँग्रेसचा पाठिंबा पुरेसा ठरणार नाही. परिणामी प्रत्येकी दोन जागा असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि सीपीआयनेही टीव्हीकेला आपला पाठिंबा देणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्या

निदा

Asaduddin Owaisi: सुक्षिशित मुस्लीम मुलामुलींना…;निदा खान प्रकरणावर असदुद्दीन ओवैसींचं भाष्य, म्हणाले,...

0
छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarनाशिक टीसीएस लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणातील मुख्य महिला आरोपी असलेली निदा खान २७ दिवस फरार होती. अखेर तिला छत्रपती...