Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याविनोदवीर राजू श्रीवास्तव यांचे निधन

विनोदवीर राजू श्रीवास्तव यांचे निधन

मुंबई | Mumbai

स्टँडअप कॉमेडीयन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर ४२ दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) उपचार सुरु होते…

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्यावर डॉक्टरांची मोठी टीम उपचार करत होती मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा निर्माण झाली असून सर्व स्थरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यू पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत.

राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नव्हती. तसेच काही दिवसांपूर्वी ब्रेन डॅमेज (Brain damage) झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

दरम्यान, राजू श्रीवास्तव यांना कलेचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला होता. त्यांचे वडील रमेश चंद्रा श्रीवास्तव (Ramesh Chandra Srivastav) हे कवी होते. राजू लहानपणापासून मिमिक्री करायचे. कलेची त्यांना विशेष आवड होती. लहानपणापासूनच त्यांना एक कॉमेडियन व्हायचे होते. टीव्ही शो, कॉमेडी शो अवॉर्ड होस्ट करण्यापासून त्यांची सुरुवात झाली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या