दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
दिंडोरी (Dindori) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (Dindori APMC) टोमॅटो (Tomato) खरेदी-विक्रीचा शुभारंभ बाजार समिती सभापती प्रशांत कड व ज्येष्ठ शेतकर्यांच्या (Farmers) हस्ते करण्यात आला.
हे देखील वाचा : Nashik News : सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाशी संलग्न; २५० कॅमेरे सुरु, उर्वरितसाठी पाठपुरावा
पहिल्याच दिवशी शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो विक्रीसाठी आपणला होता. शुभारंभ प्रसंगी ३१०० रुपये याप्रमाणे उच्च दर मिळाला असून सरासरी ६०० ते ७५० रुपये प्रती क्रेट दर मिळाला आहे. शेतकर्यांनी चांगल्या प्रतीचा टोमॅटो प्रतवारी करून विक्रीसाठी आणावा, व्यापाऱ्यानीही (Merchant) शेतकर्यांना चांगला दर द्यावा तसेच शेतकर्यांना काही अडचणी आल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा असे आवाहन बाजार समिती सभापती प्रशांत कड यांनी केले.
हे देखील वाचा : Narhari Zirwal : “जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवले”; नरहरी झिरवाळांचा मोठा खुलासा
दरम्यान, याप्रसंगी उपसभापती योगेश बर्डे, संचालक कैलास मवाळ, पांडूरंग गडकरी, गंगाधर निखाडे, शामराव बोडके, दत्तू राऊत, नरेंद्र जाधव, गुलाबतात्या जाधव, सचिव जे. के. जाधव, आर. एस. गणोरे, गुलाबराव जाधव, शरद अपसुंदे, भास्कर वसाळ, नाना धात्रक, आदींसह संचालक मंडळ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा