Sunday, May 19, 2024
Homeजळगावकौतुकास्पद ; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून या शिक्षकाने केला असा...

कौतुकास्पद ; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून या शिक्षकाने केला असा जुगाड!

डॉ.महेंद्र सांगळे

शेळावे ता.पारोळा

- Advertisement -

अगोदर कोरोना (corona) महामारीमुळे व आता (s t bus) एस.टी.चा बेमुदत संप यामुळे ग्रामिण भागातुन शहरी भागात शिक्षणासाठी रोज ये जा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे (Students) शैक्षणिक नुकसान होत आहे.

ज्या विद्यार्थी पालकांकडे खाजगी वाहन आहे ते त्याचा उपयोग करून पाल्यांना शाळेत नियमित ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. पण ज्या पालकांकडे खाजगी वाहन नाही त्यांचे पाल्य मात्र बस बंदमुळे शिक्षणापासुन वंचित आहेत.

समाजातील काही शिक्षणप्रेमी मात्र अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी प्रयत्न करतांना दिसतात. त्याचे एक सुंदर व स्तुत्य उदाहरण दगडी सबगव्हाण ता.पारोळा येथील आय.टी.आय. (iti) टेहु ता.पारोळा (parola) येथे कार्यरत शिक्षक एम व्ही पाटील (Teacher MV Patil) उर्फ मोतीलाल पाटील यांच्या रुपाने समोर आले आहे.

ते दगडीसबगव्हाण ते टेहु रोज ये-जा करतात, असे करतांना वाहना अभावी घरी राहणारे विद्यार्थी बघुन त्यांनी त्यांना मदत करण्याचे ठरवून आपल्या कल्पनाशक्तीने १० क्विंटल वजन ओढू शकेल अशी चार टायरची छान ट्रॉली बनविली व ती आपल्या मोटर सायकलला जोडणी करण्याची सोय केली.

जानेवारी महिन्यापासून शाळा उघडल्या पासून ते रोज १० ते १२ विद्यार्थ्यांना बसवून पारोळा येथे नियमित त्यांना शिकवणी व शाळेच्या कामासाठी सोडतात. संध्याकाळी परत जातांना त्यांना परत नेतात. पाटील सरांच्या या शैक्षणिक सेवेचे व स्तुत्य उपक्रमाचे परिसरात मोठे कौतुक होत आहे.

दगडीसबगव्हाण हे पारोळा धरणगाव रस्त्यावर राजवड नजिक रस्त्यापासून पाच किलो मिटर आतमध्ये आहे. विदयार्थ्यांना इतर वाहन मिळणेही अवघड आहे. त्यामुळे विद्यार्थी पाटील सरांच्या उपक्रमाचा योग्य लाभ घेत आहेत. या धाबे, तांबोळे व उत्रड परिसरातील बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सतत धडपडणारे राज्य शिक्षक मनवंतराव साळुंखे यांनी पाटील सरांचे अभिनंदन व कौतुक करून समाजातील इतर बांधवांनीही रस्त्यावर वाहनाची वाट बघत असलेल्या विद्यार्थ्यांना लिफ्ट देवून सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या