Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यारस्त्यांच्या दुरावस्वथेरून आयुक्त संतप्त; ठेकेदारांसह मनपा अभियंत्यांंवर होणार कारवाई

रस्त्यांच्या दुरावस्वथेरून आयुक्त संतप्त; ठेकेदारांसह मनपा अभियंत्यांंवर होणार कारवाई

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

सततच्या पावसामुळे (heavy rain) नाशिक शहरातील (nashik city) रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे (potholes) पडले आहेत.

- Advertisement -

त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) चांगलेच संतप्त झाले असून आज त्यांनी महापालिकेच्या सर्व अभियंत्यांसह थेट ठेकेदारांना पाचारण करून फैलावर घेतले.

गणेशोत्सवाच्या (ganeshotsav) पूर्वी शहरातील सर्व खड्डे (potholes) बुजले पाहिजे, अन्यथा ठेकेदारांसह (contractors) महापालिकेच्या अधिकार्‍यांवर व संबंधित अभियंत्यांवरदेखील कारवाई करण्याचे आदेश (Order to take action) त्यांनी दिले. रस्त्यांवरील खड्डयांप्रकरणी मनपा आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज (दि.22) रस्ते ठेकेदार व बांधकाम विभागाच्या (Construction Department) अधिकार्‍यांना समोरासमोर बसवत खरडपट्टी काढली.

शहर व उपनगरीय परिसरातील रस्त्यांची चाळण झाली असून त्यावरुन मार्गक्रमण करताना वाहनचालकांचे मणके ढिले होत असल्याची भयानक परिस्थिती आहे. आयुक्त डॉ.पुलकुंडवार यांनी हा प्रश्न गंभीरतेने घेतला असून खड्डे बुजवण्याच्या प्रगतीचा ते रोज आढावा घेत आहेत. सोमवारी त्यांनी बांधकाम विभागाचे शहर अभियंता (City Engineer), कार्यकारी अभियंता व रस्ते ठेकेदार (Road contractor) यांना एकाच टेबलावर समोरासमोर बसवत त्यांच्यातील संगनमतावर एक प्रकारे बोट ठेवले.

शहरातील खड्डेमय रस्त्यासाठी बांधकाम विभागच जबाबदार असून त्यांनी कामाची गुणवत्ता फिल्डवर जाऊन तपासली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती या शब्दात कान टोचले. तर ठेकेदारांचे कान पिळताना खड्डे बुजवताना कामात व गुणवत्तेत तडजोड नको. कामचुकारपणा केला तर थेट काळ्या यादित टाकले जाईल, असा इशारा देत गणेशोत्सवापूर्वी (ganeshotsav) शहरातील रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत, असा आदेश दिला. दरम्यान, ज्या रस्त्यांना तीन वर्ष पूर्ण झाली नसतील त्याच्या डागडुजीचा खर्च ठेकेदारांना करावा लागणार आहे.

राष्ट्रवादी आक्रमक

शहरातील चांगले रस्ते गॅस पाईपलाईन (Gas pipeline) टाकण्याकरिता खोदण्यात आले, परंतु त्यानंतर ते रस्ते पुन्हा व्यवस्थित करण्यात आलेच नाही. तसेच स्मार्ट सिटीने (Smart City) विकासकामांच्या नावाखाली खोदलेले रस्ते व कामे अर्धवट सोडल्याने गणपती उत्सवात याचा त्रास नागरिकांना होणार आहे.

शहरातील जुन्या रस्त्यांवर खड्डे (Potholes) नसून नवीन केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करून संबधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने (Nationalist Congress) महापलिका आयुक्तांना निवेदनाद्वारे (memorandum) केली आहे. शहरातील खड्डे, वाहतूक कोंडी व इतर समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांना निवेदन दिले.

यावेळी माजी गटनेते गजानन शेलार, अनिता भामरे, गौरव गोवर्धने, सलीम शेख, मधुकर मौले, मनोहर कोरडे, मनिष रावल, महेश भामरे, बाळासाहेब जाधव, समाधान तिवडे, शरीफ बाबा, औसाफ हाशमी, नदीम शेख, साजिद मुलतानी आदि उपस्थित होते. शहरातील विविध ठिकाणी रस्त्यांवर पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नागरिकांनी वारंवार तक्रार केल्यावर यातील मोजकेच खड्डे पेव्हरब्लॉक टाकून बुजविण्यात आले. परंतु पेव्हरब्लॉक टाकल्याने बाजूचे इतर खड्डे जसेच्या तसे राहिले आहे.

खड्ड्यांमध्ये पेव्हरब्लॉक टाकल्याने रस्तापेक्षा पेव्हरब्लॉक उंच होऊन वाहनांच्या टायरला त्याचा हादरा बसल्याने अपघात घडत आहे. पावसाच्या पाण्यामुळे व स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामांमुळे नाशिक शहरात संपूर्ण रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग कमी होऊन ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते. तरी महापालिका आयुक्त यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या