Friday, May 3, 2024
Homeनगरभानसहिवरा येथील शेतकर्‍याच्या तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल

भानसहिवरा येथील शेतकर्‍याच्या तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल

नेवासा (तालुका प्रतिनिधी) –

वडीलोपार्जित शेतजमीनीतून जाण्या-येण्यास सातत्याने मज्जाव केला जात असल्याने भानसहिवरा येथील टाके कुटुंबाने 10 मार्च रोजी तोडणी

- Advertisement -

अभावी उभा असलेला ऊस पेटवून देऊन त्यातच सहकुटुंब आत्मदहन करण्याचा इशारा एका शेतकर्‍याने दिला आहे.

याबाबत शेतकरी अशोक भानुदास टाके यांनी तहसीलदारांना निवेदन दिले असून त्यात म्हटले की, भानसहिवरा येथील गट नं.411 या क्षेत्रात त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली शेतजमीन आहे. गावातील एका व्यक्तीने आमच्या भावकीतील मुख्य रस्त्यालगतचे क्षेत्र कपटाने विकत घेऊन त्यांचा रस्ता अडविलेला आहे.

आमच्या कुटुंबाच्या गट नं. 411 मधील 8 व्या माहिन्यातील लागण नोंद असलेले ऊसाचे पिक यंदाच्या गळीत हंगामात तोडून नेण्यास गेल्या तीन-चार महिन्यांपासून तयार असून सदर व्यक्तीचे कुटुंबीय ऊसतोडीची वाहने आमच्या शेतात येण्यास मज्जाव करत आहेत. आम्हाला न्याय न मिळाल्यास मी व माझे संपूर्ण कुटुंबीय सदर व्यक्तीच्या कुटुंबियांच्या जाचास तसेच प्रशासनाच्या असंवेदनशील व बेजबाबदार कारभारास कंटाळून 10 मार्च 2021 रोजी आमच्या गट नं. 411 क्षेत्रातील तोडणी अभावी उभे ऊसाचे पिक पेटवून देऊन या पेटत्या ऊसाच्या पिकातच सामुहिक आत्मदहन करणार आहोत असे नमूद केले आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री यांची पाठविण्यात आलेल्या आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल

तक्रारदार अशोक टाके यांनी निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेल केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाने श्री.टाके यांचा मेल पुढील कार्यवाहीसाठी नगर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाकडे पाठविला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या