Sunday, May 19, 2024
Homeजळगावअवैध व नकली दारूची उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार

अवैध व नकली दारूची उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार

चोपडा । प्रतिनिधी chopada

शहरात व ग्रामीण भागात तसेच (jalgaon) जळगाव जिल्ह्यात अवैध दारूचा महापूर वाहत असल्याची तक्रार (Nationalist Congress) राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष (Amritrao Sachdev) अमृतराव सचदेव यांनी थेट उपमुख्यमंत्री ना.अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) आणि (Excise Department) उत्पादन शुल्क विभागाचे राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे केल्यानंतर अवघ्या 12 तासांत च नाशिक येथून उपायुक्त ए.एन.ओहोळ चोपडा शहरात दाखल होऊन तक्रारदार अमृतराज सचदेव यांची भेट घेतली.

- Advertisement -

यावेळी त्यांनी अवैध व नकली दारूची तक्रार ऐकून घेऊन सचदेव यांचे म्हणणे लेखी जबाब म्हणून नोंदविला. मात्र राज्य उत्पादन विभागाचे उपायुक्त शहरात येऊन देखील अवैध व नकली दारू विक्रेत्यांवर कुठलीच कारवाई न करता थेट नाशिकला परतले.

सचदेव यांच्या तक्रारी संदर्भात उपायुक्त ओहोळ यांनी सांगितले की, अवैध व नकली दारू विक्रीच्या घटनेची गंभीर दखल घेतली असून, प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करून वरिष्ठ अधिकार्‍यां कडे तसा अहवाल पाठवला जाईल.

तसेच अवैध दारू विक्री थांबवण्यासाठी शोधमोहीम सुरु केली जाईल. यावेळी त्यांच्यासोबत भुसावळ विभागाचे जळगाव येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सी.एच.पाटील, चोपडा विभागाचे दुय्यम निरीक्षक आनंद पाटील, कॉन्स्टेबल नरेंद्र पाटील, कॉन्स्टेबल विपुल राजपूत उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष श्यामकांत परदेशी,विजय पाटील, पीपल बँकेचे उपाध्यक्ष प्रवीण गुजराथी, सनी सचदेव, प्रफुल्ल पाटील, संजय श्रावगी, श्याम सोनार यांच्यासह परवानाधारक दारू विक्रेत्यांनी निवेदन दिले. यावेळी उपायुक्त ए.एन.ओहोळ यांनी पत्रकारांशी बोलताना काउंटर दारू विक्रीस मज्जाव केला जाईल व संबंधिताचा परवाना कायमस्वरूपी बंद करण्याचे आश्वासन दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या