Monday, October 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAccident : सिटी लिंक बसमधून वाहक रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी

Accident : सिटी लिंक बसमधून वाहक रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी

इंदिरानगर । वार्ताहर Indira Nagar

- Advertisement -

नाशिक शहरात विनयनगर चौकात रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास गतिरोधकावरून भरधाव सिटी लिंक बस गेल्याने बसमधील वाहक रस्त्यावर फेकला गेला. या घटनेत वाहक गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने वेळीच नागरिकांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.

गर्जना प्रतिष्ठानचे संस्थापक प्रवीण जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित सिटी लिंक बस साईनाथ चौफुलीकडे जात होती. पंचमुखी हनुमान मंदिराजवळील गतिरोधकावरून बस वेगाने गेल्याने तिला जोरदार धक्का बसला. या धक्क्यामुळे बसचा दरवाजा अचानक उघडला आणि दरवाजाजवळ उभा असलेला वाहक थेट रस्त्यावर कोसळला.

वाहक खाली पडल्याचे चालकाच्या लक्षात आले नाही. मात्र, रस्त्यावरील सतर्क नागरिकांनी आरडाओरडा करून चालकाचे लक्ष वेधले. त्यानंतर बस थांबविण्यात आली. जखमी वाहकाला नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.

नागरी वस्त्यांमधून धावणाऱ्या सिटी लिंक बसच्या वेगाबाबत यापूर्वीही नागरिकांकडून तक्रारी केल्या जात असल्याचे सांगण्यात येते. अरुंद रस्ते, चौक आणि गतिरोधक असतानाही बस वेगाने चालविल्या जात असल्याने पादचारी, दुचाकीस्वार आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे बसच्या दरवाजांची सुरक्षितता, चालकांची दक्षता आणि वाहकांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी
सिटी लिंक बससेवेच्या संचालनावर देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणेने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बसचालकांचे समुपदेशन, वेगमर्यादेची काटेकोर अंमलबजावणी, दरवाजांच्या यंत्रणेची नियमित तपासणी आणि दोषींवर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

Jamkhed : जामखेडमध्ये दुकान आगीत खाक

0
जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed शहरातील नगररोडवरील शासकीय विश्रामगृहासमोरील आनंद कुशन दुकानाला रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून,...