चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी
चाळीसगाव नगरपरिषदेतील दोन अपक्ष नगरसेवक व शहवि आघाडीच्या नगसेवकांनी काही दिवसांपूर्वीच सयुक्तरित्या पत्रपरिषदेत घेवून, त्यात शहवि आघाडीला दोन अपक्ष नगरसेवकांनी जाहिररित्या पाठींबा घोषीत केला होता. परंतू आता शहवि आघाडीचे प्रवक्ता आण्णा कोळी यांनी अपक्ष नगरसेवक आमच्या सोबत नाही, तसेच नगराध्यक्षांवर आम्ही आता अविश्वास ठराव आननार नाही, विकास कामासांसाठी आम्ही सत्ताधार्या सोबत आहोत असा खुलासा पत्रपरिषदेत गेला.
त्यामुळे शहवि आघाडीच्या नगरसेवकांमध्ये अपक्ष नगरसेवकांवरुन व इतर मुद्दावरुन समभ्रंम दिसून आला. तसेच अण्णा कोळी यांनी आम्ही विकास सोबत आहोत, म्हणजेच सत्ताधार्या सोबत आहोत असा देखील अप्रत्यक्षपणे खुलास केला आहे. शहरातील नगरसेवक आण्णा कोळी यांच्या कार्यालयात आज (दि,९) पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक शेखर देशमुख, माजी नगरसेवक श्याम देशमुख, नगसेविका संगीता गवळी, यास्मीन बी फकीरा मिर्झा, फकीरा मिर्झा आदि उपस्थित होते.