Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद महापालिकेतील जन्म-मृत्यू नोंदणी विभागात घोळ!

औरंगाबाद महापालिकेतील जन्म-मृत्यू नोंदणी विभागात घोळ!

औरंगाबाद – Aurangabad

औरंगाबादमहापालिकेत (Municipal Corporation) जन्म-मृत्यू नोंदीचा घोळ उघड झाला आहे. गेल्या पाच वर्षात वीस हजारावर प्रकरणांची नोंद नसल्याची माहिती हाती आली आहे. वॉर्ड कार्यालयांमध्येच या नोंदी पडून आहेत. त्यामुळे येत्या दीड महिन्यात या सर्व नोंदी ऑनलाईन पध्दतीने एकत्रित करण्याचे आदेश सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

- Advertisement -

जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासाची नोंद महापालिका ठेवते. नागरिकांनाही महापालिकेत येऊन जन्म आणि मृत्यूची नोंद करावीच लागते. नोंदणीच्या नंतर संबंधितांना वॉर्ड अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र दिले जाते. वॉर्ड कार्यालयात नागरिकांकडून केल्या जाणाऱ्या नोंदी एकत्रित ऑनलाईन पद्धतीने संकलित करून त्याची माहिती पालिकेच्या मुख्यालयासह शासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचवणे गरजेचे असते; परंतु ही प्रक्रिया महापालिकेत गेल्या पाच वर्षात करण्यात आली नसल्याची माहिती मिळाली आहे.

महापालिकेत सरकारने डॉ. पारस मंडलेचा यांची प्रतिनियुक्तीवर (Health Medical Officer) आरोग्य वैद्यकीय अधिकारी म्हणून बदली केली आहे. प्रशासकांनी त्यांच्याकडे जन्म-मृत्यू नोंदणीसह अन्य प्रशासकीय कामांची जबाबदारी दिली आहे. डॉ. मंडलेचा यांनी जन्म-मृत्यू नोंदणीची तपासणी वॉर्ड कार्यालयनिहाय सुरू केल्यावर नोंदींमध्ये घोळ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. 2016 पासून वॉर्ड कार्यालयांनी जन्म-मृत्यू नोंदणीची ‘अपडेट यादी’ तयारच केली नसल्याचे स्पष्ट झाले. या नोंदणींची संख्या वीस हजारावर आहे. जन्म-मृत्यू नोंदणीतील घोळ उघडकीस आल्यानंतर डॉ. मंडलेचा यांनी हा प्रकार अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांच्या निदर्शनास आणून दिला. नेमाने यांनी या घोळाचे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि सर्वच्या सर्व नऊ वॉर्ड अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली. नोंदींमध्ये घोळ कसा राहिला याची विचारणा त्यांनी केली असता वॉर्ड अधिकाऱ्यांनी संगणक नाही, डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data entry operator) नाही, ऑनलाईन पध्दत विकसीत केलेली नाही अशी कारणे सांगितली.

- Advertisment -

ताज्या बातम्या