Thursday, May 2, 2024
Homeराजकीयशेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसतर्फे आंदोलन

शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसतर्फे आंदोलन

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

नंदुरबार तालुका काँग्रेस कमिटी मार्फत केंद्र शासनाने कृषी व शेतकरी संदर्भात पारित केलेल्या तीन कृषी विषयक कायद्याच्या विरोधात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

या निवेदनात म्हटले आहे कि, मोदी शासनाने कृषी व शेतकरी संदर्भात पारित केलेल्या तीन कृषी विषयक काळ्या कायद्याच्या देशातील शेतकरी निदर्शने व आंदोलन करीत आहेत.

त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय नंदुरबार जिल्हा व नंदुरबार तालुका काँग्रेस पक्षाने घेतला आहे.

पक्षाचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला काँग्रेस तसेच तालुक्यातील शेतकरी व शेतमजूर यांच्या वतीने मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

शेतकर्‍यांना सन्मानाची वागणूक देऊ असे म्हणणारे मोदी सरकारने शेतकर्‍यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज,थंड पाण्याचे फवारे, अश्रुधूर यासारखे अमानुष कृत्य करून शेतकर्‍यांना थांबवण्याचे षडयंत्र केले आहे.

काळ्या मातीत राबणारा अन्नदाता रस्त्यावर थंडीवार्‍यात पडलेला आहे. पंजाब हरियाणा राजस्थान या तीनही राज्यातील शेतकरी बांधवांच्या आंदोलनाला आम्ही जाहीरपणे पाठिंबा देत आहोत व नंदुरबार काँग्रेस पक्ष शेतकरी व शेतमजूर जाहीर निषेध करीत आहोत.

वेळ आल्यावर रस्त्यावर उतरू असा ईशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी पंडितराव पवार, शांतीलाल पाटील, देवाजी चौधरी, इकबाल खाटीक, नरेश पवार,दिलावर शहा कादर शहा, मुरलीधर पाटील, सखाराम वाघ, पावभा पाटील,दादा पाटील, सुदाम भिल,खंडेराव पवार आदी उपस्थित होते.

नवापूर येथे तहसीलदारांना निवेदन

मोदी शासनाने कृषी व शेतकरी संदर्भात पारित केलेल्या तीन कृषी विषयक काळया कायद्याच्या विरोधात देशातील शेतकरी पंजाब, हरीयाना, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व इतर राज्य निदर्शने व आंदोलन करीत आहे.

त्या आंदोलनाला नवापूर तालुका कॉग्रेस पक्षाने पाठींबा दिला आहे.याबाबतचे याबाबतचे निवेदन तहसिलदार मंदार कुलकर्णी, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना नवापूर तालुका कॉग्रेस पक्षातर्फे देण्यात आले. नवापूर तहसिल कार्यालयासमोर मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

या निवेदनात म्हटले आहे की, मोदी शासनाने कृषी व शेतकरी संदर्भात पारित केलेल्या तीन कृषीविषयक काळ्या कायद्याच्या विरोधात देशातील शेतकरी निदर्शने व आंदोलन करीत आहेत. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय नंदुरबार जिल्हा व नवापूर तालुका काँग्रेस पक्षाने घेतला आहे.

नंदुरबार जिल्हाचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी, आ.शिरीषकुमार नाईक, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, जिल्हा उपाध्यक्ष रतन गावीत, तालुकाध्यक्ष जालमसिंग गावित, पं.स सभापती रतिलाल कोकणी, नगराध्यक्ष हेमलता पाटील, उपनगराध्यक्ष आरिफ बलेसरीया, गटनेता आशिष मावची सह तालुक्यातील शेतकरी व शेतमजूरांच्या वतीने सरकारचा निषेध करण्यात आला.

सरकारने शेतकर्‍यांविषयी त्यांच्या व्यथा समजून न घेता व त्यांना विश्वासात न घेता तयार केलेल्या शेतकरी विरोधी तीन विधेयके मंजूर करून शेतकर्‍यांवर मोठा अन्याय केला आहे.

पंजाब, हरियाणा व राजस्थान या तीनही राज्यातील शेतकरी बांधवांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. निवेदन देतांना आ.शिरीषकुमार नाईक, नवापूर तालुका कॉग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत, पं.स सभापती रतिलाल कोकणी, पं.स सदस्य ललीता वसावे, प्रियंका गावीत, नगराध्यक्ष हेमलता पाटील, उपनगराध्यक्ष आरीफ बलेसरीया, गटनेता आशिष मावची, नगरसेक हारुन खाटीक, माजी नगराध्यक्ष दामू बिर्‍हाडे, माजी उपनगराध्यक्ष सोहेल बलेसरीया, फारुक शहा, माजी नगरसेवक अजय पाटील, सुभाष कुंभार, पराग नाईक, संजय वसावे, जयंत पाडवी, यशोदा वळवी, राजेश गावीत, विजय गावीत, मोहमद मुल्ला, फेजल शेख, इरफान मुल्ला, रहेमत खान, तुराब पठाण, विलास वसावे, राम कोकणी आदी उपस्थित होते. यावेळी मोठया संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या