Friday, October 18, 2024
Homeब्रेकिंग न्यूजनांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला; 'या' नेत्याला मिळाली संधी

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला; ‘या’ नेत्याला मिळाली संधी

मुंबई | Mumbai

काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण (Vasant Chavan) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या नांदेडच्या (Nanded) जागेवर विधानसभेच्या निवडणुकीसोबतच पोटनिवडणूक (By-Election) होणार आहे.या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे सुपुत्र रविंद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेसकडून उमेदवार जाहीर झाला असला तरी भाजपकडून (BJP)अद्यापही उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे उमेदवार कोण असणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! चांदवडमधून राहुल आहेरांची भावासाठी माघार; पक्षाकडे उमेदवारी देण्याची केली मागणी

काँग्रेसने नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात काँग्रेसकडून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने (Congress) नांदेडच्या रिक्त जागेसाठी रविंद्र चव्हाण यांच्या एकमेव नावाची शिफारस केली होती. त्यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात होते. शिवाय राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही सांत्वन भेटी दरम्यान कुटुंबियांना आश्वासन दिले होते. अखेर काँग्रेस कमिटीने आज रविंद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यांच्या नावाची घोषणा झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. तसेच काँग्रेसने मेघालय येथील विधानपरिषद निवडणुकीसाठी जिंगजँक मरक यांना संधी दिली आहे.

हे देखील वाचा : Nirmala Gavit : इगतपुरी मतदारसंघाचे राजकीय समीकरण बदलणार; निर्मला गावित काँग्रेसमध्ये परतणार?

लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेससोडून भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्यासमवेत अनेकजणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे नांदेडसह मराठवाड्यात भाजपला फायदा होईल, असे म्हटले जात होते. मात्र मराठवाड्यातील सर्व जागांवर भाजपचा पराभव झाला.यानंतर नांदेड लोकसभा निवडणुकीची (Nanded Loksabha Election) जागा वसंत चव्हाण यांनी लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर यांचा जवळपास ६० हजार मतांनी पराभव केला होता.

हे देखील वाचा : Sameer Wankhede : डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे उतरणार निवडणुकीच्या रिंगणात; ‘या’ पक्षाकडून उमेदवारी मिळणार

दरम्यान, नांदेड पोटनिवडणूक तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. एमआयएमचे (MIM) नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) या निवडणुकीत उतरणार आहेत. तर अद्याप भाजपने उमेदवाराची घोषणा केलेली नाही, त्यामुळे त्यांनी उमेदवाराची घोषणा केल्यावर भाजप, काँग्रेस आणि एमआयएममध्ये ही लढत होऊ शकते.

हे देखील वाचा : Nashik Civil Hospital News : बाळ अदलाबदल प्रकरणी सात डॉक्टरांसह एका परिचारिकेचे निलंबन

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक संपूर्ण वेळापत्रक

निवडणूक अधिसूचना – २२ ऑक्टोबर २०२४

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख – २९ ऑक्टोबर

उमेदवारी अर्ज पडताळणी तारीख – ३० ऑक्टोबर २०२४

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – ४ नोव्हेंबर २०२४

मतदानाची तारीख – २० नोव्हेंबर २०२४

निकाल – २३ नोव्हेंबर २०२४

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या