Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPrithviraj Chavhan: देशात १९ डिसेंबरला मोठा राजकीय भूकंप होणार; मराठी माणूस पंतप्रधान...

Prithviraj Chavhan: देशात १९ डिसेंबरला मोठा राजकीय भूकंप होणार; मराठी माणूस पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत

मुंबई | Mumbai
राज्यात एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरु असताना दुसरीकडे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. येत्या १९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार असून देशाचा पंतप्रधान बदलून एक मराठी माणूस पंतप्रधान होईल, असा मोठा दावा त्यांनी यावेळी केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण नेमके काय म्हणाले?
काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी हा दावा करताना जगात घडणाऱ्या घडामोडींचे संदर्भ दिले आहे. अमेरिकेतील नव्या कायद्याचा दाखला चव्हाणांनी दिला. अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्त्राईलचा गुप्तहेर होता. त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केलेत, आता लवकरच तो अनेकांचा पर्दाफाश करणार आहे. त्यामुळे अमेरिकेत मोठा धुमाकूळ होणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. अमेरिका सरकार एक कायदा करुन येत्या १९ डिसेंबरला त्या दिग्गजांची नावे जाहीर करणार आहे असा दावा चव्हाणांनी केला आहे. आता यात कोणाकोणाची नावे आहेत? याची मला फारशी कल्पना नाही. असे म्हणत चव्हाणांनी अमेरिकेतल्या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतात उमटण्याची शक्यता वर्तवली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जनगणमन या पुस्तकाच्या प्रकाशन केल्यानंतर चव्हाणांनी भारतात १९ डिसेंबरला राजकीय भूकंप होण्याचे भाकीत केले.

- Advertisement -

“जगामध्ये सध्या बरेच काही सुरु आहे. मध्यंतरी मी एक ट्वीट केले होते. ते ट्वीट खूप व्हायरल झाले होते. मी म्हटले होते की, कदाचित महिन्याभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल. मला अनेकांचे फोन आले. याचा अर्थ काय? कोण म्हटले? तुम्ही होणार आहात का? कोणाला याची पार्श्वभूमी माहिती नव्हती. आता मराठी माणूस होणार म्हणजे सध्या बसलेल्या माणसाला बाजूला व्हावे लागेल, मी आधीच अधोरेखीत केले आहे. बहुतेक बदल घडण्याची शक्यता आहे. बदल घडला तरी काँग्रेसचा माणूस हा काही पंतप्रधान होणार नाही, कारण आमच्याकडे तेवढे बहुमत नाही. सत्तेत असलेल्या लोकांपैकीच कोणीतरी होईल आणि तो कदाचित मराठी माणूस असू शकतो. १९ डिसेंबरला हे घडेल, असा माझा अंदाज आहे.” असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

YouTube video player

तर, या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतातही दिसतील. कदाचित भारताचा पंतप्रधानही बदलेल असे ते म्हणाले. यापूर्वी सांगलीमध्ये एका पत्रकार परिषदेतही त्यांनी असाच दावा केला होता. मराठी माणूस लवकरच पंतप्रधानपदी दिसेल असा दावा त्यांनी केला होता. यावेळी त्यांनी त्यामागे अमेरिकेतील राजकीय घडामोडींचा संदर्भ दिला आहे. अमेरिकेत जेफ्री एपस्टाईन फाईल्समुळे तुफान आले आहे. त्यात ट्रम्प यांचाही समावेश आहे. डेमोक्रॅटिक समितीच्या सदस्यांनी चौकशी थांबणार नसल्याचे आणि अहवाल सार्वजनिक करण्याचे सुतोवाच केलेले आहे. या समितीने परवा डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री यांच्यासोबतचे १९ फोटो सार्वजनिक केले. त्यावरून अमेरिकेत राजकीय वादळ उठलेले आहे. त्याचा आधारे पृथ्वीराज चव्हाण दावा करत असल्याचे बोलत आहेत. तर भाजपच्या नेत्यांनी हा दावा फेटाळला आहे. अमेरिकेतील काही कागदपत्रांआधारे तिथे उलथापालथ होईल. त्या आधारे भारताचा पंतप्रधान कसा बदलणार? असा सवाल भाजपचे नेते विचारत आहेत. त्यांनी मराठी माणूस पंतप्रधानपदी येणार असल्याचा आणि पंतप्रधान बदलण्याचा दावा मान्य नसल्याचे म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...