Sunday, November 17, 2024
Homeदेश विदेशअमेठीतून नाही तर 'या' मतदारसंघातून राहुल गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

अमेठीतून नाही तर ‘या’ मतदारसंघातून राहुल गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली | New Delhi
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या वेळेप्रमाणे दोन जागांवरून निवडणुकीचा उमेदवारीचा अर्ज भरला आहे. ते वायनाड आणि रायबरेलीमधून निवडणूक लढवणार आहेत. यावेळी प्रियांका गांधीही निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र कोणत्याही जागेवरून त्यांची उमेदवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

शुक्रवारी सकाळी काँग्रेसने अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यानंतर राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी वड्रा, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतरांसह रायबरेलीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले होते.

- Advertisement -

रायबरेली आणि अमेठीच्या जागांसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. या जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी आज रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

रायबरेलीमधूनच राहुल गांधींनी अर्ज का दाखल केला?
ते म्हणाले, ”गांधी घराण्याच्या बालेकिल्ल्याचा विचार केला तर, फक्त अमेठी-रायबरेलीच नाही तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत संपूर्ण देश गांधी घराण्याचा गड आहे. राहुल गांधी उत्तर प्रदेशातून तीनदा आणि केरळमधून एकदा खासदार झाले, पण विंध्याचलमधून निवडणूक लढवण्याची हिंमत मोदीजी का दाखवू शकले नाहीत?”

फिरोज गांधी यांच्यापासून सोनिया गांधींपर्यत तब्बल १६ वेळा गांधी-नेहरू कुटुंबातील व्यक्ती रायबरेलीमधून खासदार म्हणून विजयी झाले. १९७७ मध्ये जनता पार्टीच्या राज नारायण यांनी रायबरेलीतून इंदिरा गांधींचा पराभव केला होता. मात्र १९८० मध्ये इंदिरा गांधी तिथून पुन्हा खासदार म्हणून निवडून आल्या. २००४ पासून लागोपाठ पाचवेळा सोनिया गांधी इथून खासदार आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या