दिल्ली | Delhi
देशात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ४८ लाखाच्याही पुढे गेली आहे. या मुद्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. राहुल गांधी काही दिवसापासून सरकारला वेगवेगळ्या मुद्द्या वरुन घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांची आज ट्विट करत त्यांच्यावर टीका केली आहे.
देशातील करोना बाधितांची संख्या ४८ लाखांच्या वर
राहुल गांधी यांनी म्हंटले आहे की, “भारतात करोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या या आठवड्यात 50 लाखांपेक्षा अधिक झाली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील 10 लाखांचा आकडा पार करेल. कोणतंही नियोजन न करता केलेला लॉकडाऊन एका व्यक्तीच्या अहंकाराचा परिणाम आहे. त्यामुळे संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग झाला. मोदी सरकार ‘आत्मनिर्भर बनो’ असं म्हणत आहे या ‘आत्मनिर्भर’ होण्याचा अर्थ आपला जीव आपणच वाचवा असा आहे. कारण पंतप्रधान मोदी मोरांसोबत व्यग्र आहेत.”