Thursday, March 13, 2025
HomeनाशिकNashik Political : आ. सीमा हिरेंना पुन्हा संधी द्या - भुजबळ

Nashik Political : आ. सीमा हिरेंना पुन्हा संधी द्या – भुजबळ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

लोकांची कामे करणाऱ्या, लोकांशी प्रेमाने बोलणाऱ्या, अत्यंत सालस आणि सुस्वाभावी व्यक्तिमत्त्वाच्या सीमा महेश हिरे यांना नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या नागरिकांनी पुन्हा एकदा संधी दिलीच पाहिजे आणि प्रचंड मतांनी त्यांना निवडून दिले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

- Advertisement -

नाशिक पश्चिमच्या भाजप, महायुतीच्या उमेदवार सीमा महेश हिरे (Seema Hiray) यांच्या प्रचारार्थ जारी केलेल्या संदेशात भुजबळ यांनी वरीलप्रमाणे आवाहन केले. या संदेशात भुजबळ म्हणतात की, सीमा हिरेंचे आमदार म्हणून दहा वर्षांचे काम मी जवळून पाहिले असून, त्या जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर, सहज उपलब्ध असणा-या आहेत. मतदारसंघाच्या प्रगतीसाठी आणि सामान्यांच्या कामांसाठी त्यांचे संपूर्ण कुटुंब सतत प्रयत्नरत असते. हिरेंनी दहा वषर्षात राबवलेले कल्पक उपक्रम आणि शासनाच्या (Government) योजनांचा मतदारसंघातील नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम त्यांना सहज विजय मिळवून देतील, याचा मला विश्वास आहे, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

तसेच सीमा हिरे यांच्या प्रचारासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या नेते, कार्यकत्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा सुरू केली असून, मतदारसंघात सर्वदूर बैठका, रॅली, मिळावे, चौक सभा, पत्रकेवाटप, मतदारांना स्लिप वाटप करून सर्वत्र भाजप आणि सीमा हिरेंसाठी सकारात्मक वातावरण निर्मिती केली जात आहे. त्याचा परिणामही दिसून येऊ लागला आहे. सर्वत्र सीमा हिींनाच आम्ही मतदान (Voting) करणार, असा विश्वास दिला जातोय. त्यामुळे हिरेंचा विजय निश्चित असल्याचे सर्वांमुखी ऐकायला मिळत आहे.

दरम्यान, महाराष्ट्राची (Maharashtra) हास्य जत्रा फेम प्रसिद्ध अभिनेता श्यामसुंदर राजपूत यांनी विविध महिला मेळाव्यांना भेटी देऊन, चौकसभांना, प्रचार फेन्ऱ्यांना हजेरी लावून हिरेंसाठी प्रचार केला. त्यामुळे हिरे यांच्या प्रचारात आगळी रंगत भरली आहे. विविध सामाजिक संघटनांच्या बैठकांना सीमा हिरेंना निमंत्रण मिळत आहे आणि त्या बैठकांमधून त्यांना जाहीर पाठिंबा दिला जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...