Thursday, March 13, 2025
HomeनाशिकNashik Political : शोभायात्रेत प्रा. फरांदे यांनी साधला मतदारांशी संवाद

Nashik Political : शोभायात्रेत प्रा. फरांदे यांनी साधला मतदारांशी संवाद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या (Mahayuti) अधिकृत उमेदवार प्रा. देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांच्या शोभायात्रेला मुंबई नाका (Mumbai Naka) येथून सुरुवात करण्यात आली. मोठ्या उत्साहात कार्यकर्ते, नागरिक यांच्या गर्दीत शोभायात्रेचे सर्वत्र स्वागत करण्यात आले. माजी नगरसेविका सुमन भालेराव, अर्चना थोरात, माजी नगरसेवक संदीप लेनकर यांच्या नियोजनात प्रभाग १५ मध्ये शोभायात्रा झाली. मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला.

- Advertisement -

सह्याद्री हॉस्पिटल चौक, सावित्रीबाई फुले शाळा, वृंदावन कॉलनी, गणपती मंदिर, कॅमल हाऊस, काठे गल्ली चौक, बनकर चौक, संत सावता माळी उद्यान, स्वामी समर्थ केंद्र, शंकरनगर चौफुली या परिसरात महिलांनी आपल्या लाडक्या बहिणीचे स्वागत करून औक्षण केले. ज्येष्ठांनी आशीर्वाद दिले तर पुरुष मतदारांनी उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मोठे मताधिक्क्य मिळून विक्रमी यशासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रचारफेरीत बंटी तिदमे, तेजश्री काठे, नाना शिलेदार, हरिभाऊ जाधव, मिलिंद भालेराव, दत्ता शिंदे, शैलेश जुझे, प्रमोद बनकर, बाळासाहेब काठे, लक्ष्मण अमृतकर, तुषार जुन्नरे, किरण आंबेकर, मंगेश नाईक, हर्षल पाठक, गणेश तांबे, नंदू उन्हाळे, लता वाघ, भारी पाटील, राकेश जगताप, सचिन काठे, पवन उगले हे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा सहभाग होता. मोठ्या उत्साहात नवमतदार उपस्थित होते.

प्रचार कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन

या शोभायात्रेदरम्यान माजी नगरसेवक संदीप लेनकर यांच्या नेतृत्वात न वशक्ती चौक, भाभानगर येथे उमेदवार प्रा. आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात झाले. यावेळी माजी नगरसेवक सुनील खोडे, तेजश्री काठे, जयंत पाटील असंख्य नागरिक तसेच महिला उपस्थित होत्या.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...