Thursday, January 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRahul Gandhi : "छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं संविधान…"; राहुल गांधींचा कोल्हापूरातून मोदींवर...

Rahul Gandhi : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं संविधान…”; राहुल गांधींचा कोल्हापूरातून मोदींवर निशाणा

कोल्हापूर | Kolhapur

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज महाराष्ट्र दौऱ्यावर (Maharashtra tour) असून त्यांच्या हस्ते कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी त्यांनी बोलतांना पुन्हा एकदा संविधान धोक्यात असल्याचा सूर आळवला.तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे प्रतिबिंब राज्यघटनेत असल्याचे म्हटले. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा संदेश दिला असे म्हणत पंतप्रधान मोदींवर टीका केली.

- Advertisement -

यावेळी बोलतांना राहुल गांधी म्हणाले की, “हा कार्यक्रम काल होणार होता, मात्र विमानात बिघाड झाल्यानं येऊ शकलो नाही. तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल माफी मागतो. ज्यांची मूर्ती बनते त्यांच्या विचाराचे आपण समर्थन करतो. महाराज सर्वांना बरोबर घेऊन जात होते. देश सर्वांचा आहे हे त्यांचे विचार होते. २१ व्या शतकात तेच विचार संविधानात आहे. देशामध्ये एक विचारधारा संविधान वाचायचा प्रयत्न करते. तर दुसरी विचारधारा शिवाजी महाराजांच्या विचाराचे संविधान कसे संपवले जाईल याचा प्रयत्न करत आहे. हिंदुस्थानातील संस्थांवर आक्रमण केले जात असून लोकांना घाबरवले जात आहे. धमकावले जात आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर माथं टेकतात. त्याला काही अर्थ नाही. तुम्ही शिवाजी महाराजांच्यासमोर नतसमस्तक होता तर तुम्हाला संविधानाचं रक्षण केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

YouTube video player

हे देखील वाचा : महाराष्ट्रात NIA आणि ATS ची तीन जिल्ह्यांत छापेमारी; तिघे जण ताब्यात

पुढे बोलतांना ते म्हणाले की, “आज आपण मूर्तीचे अनावरण करत आहोत. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. हा केवळ एक पुतळा नाही, तर पुतळा जेव्हा बनवतो तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या विचारधारेला त्यांच्या कर्माला मनापासून समर्थन करतो. शिवाजी महाराज ज्या गोष्टींसाठी आयुष्यभर लढले, त्या गोष्टीसाठी आपण लढलो नाही तर पुतळा अनावरणाला काही अर्थ नाही.महाराजांचा राज्याभिषेक होत असताना याच दुसऱ्या विचारधारेने त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता. त्याविरोधात महाराज लढत होते. त्यांची नियत नीट नव्हती म्हणून त्यांच्या हातातून अनावरण झालेला पुतळा कोसळला. त्यांनी राम मंदिर, संसदेत ‌आदिवासी राष्ट्रपतींना उद्घाटनाला बोलावले नाही. हीच यांची विचारधारा आहे. महाराष्ट्रात महाराजांची विचारधारा आहे, संविधान वाचवा म्हणजेच महाराजांचे विचार वाचवा” असे आवाहनही यावेळी राहुल गांधींनी उपस्थितांना केले.

पुढे बोलताना त्यांनी भाजपालाही लक्ष्य केले. ते म्हणाले की, भाजपाचे लोक सकाळी उठतात आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचे संविधान कसं संपायचं यासाठी प्रयत्न करतात. भाजपाचे लोक भारतातील विविध संस्थांवर आक्रमण करतात. लोकांना घाबरतात आणि इतकं करूनही परत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतात. याला काहीही अर्थ नाही. जर तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत असाल, तर तुम्हाला संविधानाचे रक्षण करावेच लागेल, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

हे देखील वाचा : Crime News : मुंबईत अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाची धारदार शस्राने वार करत निर्घूण हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

त्याबरोबरच शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवरूनही राहुल गांधी यांनी भाजपावर शाब्दिक हल्लाबोल केला.ते म्हणाले की, भाजपाने राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला. मात्र, काही दिवसातच तो पुतळा कोसळला, कारण सरकारची नियत खराब होती. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असला, तर त्याच्या विचारांचे संरक्षण करावंच लागेल, असं संदेश महाराजांच्या पुतळ्याने दिला. मात्र, भाजपाचे लोक महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन हात जोडतात. मात्र, त्यांच्याच विचार पायदळी तुडवण्याचं काम करतात, असे राहुल गांधींनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

महेश

“तेव्हा मला मुंबईकर म्हणून लाज वाटते…”; महेश मांजरेकरांकडून खंत व्यक्त

0
मुंबई | Mumbaiमुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातले राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची...