Friday, May 3, 2024
Homeराजकीयकाँग्रेस खासदार राजीव सातव यांची करोनावर मात

काँग्रेस खासदार राजीव सातव यांची करोनावर मात

पुणे – काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांनी 19 दिवसांनंतर अखेर कोरोनावर मात केली आहे. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राजीव सातव यांची 22 एप्रिलला कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांनतर 23 एप्रिलला पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्याने 25 एप्रिल ला त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं होतं. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आता त्यांनी कोरोनावर मात केली आहे.

- Advertisement -

राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांचे ते विश्‍वासू सहकारी मानले जातात. राजीव सातव यांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करुन विचारपुस केली आहे. उद्धव ठाकरे यांनी सर्वोतपरी मदत करु असे आश्‍वासन दिलं होतं. अखेर राजीव सातव हे कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या