Sunday, May 19, 2024
Homeनगरकाँग्रेस बालेकिल्ल्याची जबाबदारी आ. राम शिंदे यांच्या खांद्यावर

काँग्रेस बालेकिल्ल्याची जबाबदारी आ. राम शिंदे यांच्या खांद्यावर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भाजपने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी देशातील 54 नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा नेत्यांचा समावेश आहे. कनार्टकातील अनेकल विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. त्या मतदारसंघाचे प्रभारी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आ. राम शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे नुकतेच अयोध्याच्या दौर्‍यावरून परतले असून लगेचच कर्नाटकातील मोहिमेसाठी रवाना झाले आहेत.

- Advertisement -

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आता भाजपने जोर लावला आहे. त्यासाठी तेथील अवघड वाटणार्‍या 54 मतदारसंघांसाठी एकएका नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. देशभरातील 54 नेत्यांकडे अशी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, जयकुमार रावल, योगेश सागर, प्रसाद लाड यांचा समावेश आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

बंगळुरू जिल्ह्यातील 177 अनेकल विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी आ. शिंदे यांच्यावर सोपवली आहे. प्रा. शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अयोध्येला गेले होते. तेथून परत आल्यानंतर शिंदे आपल्या सहकार्‍यांसह कर्नाटक दौर्‍यावर रवाना झाले आहेत. अनेकल विधानसभा मतदारसंघ ह काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. तो जिंकण्यासाठी भाजपने निश्चय केला आहे. तेथील समन्वयाची जबाबदारी शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. शिंदे पुढील काही दिवस आपल्या निवडक कार्यकर्त्यांसोबत तेथेच थांबणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या