Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Assembly Elections: बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांवर काँग्रेसकडून कारवाई; 'इतक्या' नेत्यांना पक्षातून केले...

Maharashtra Assembly Elections: बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांवर काँग्रेसकडून कारवाई; ‘इतक्या’ नेत्यांना पक्षातून केले निलंबित

मुंबई | Mumbai
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या निवडणुकीत विविध पक्षाच्या अनेक नेत्यांनी बंडखोरी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा नेत्यांवर पक्षांकडून कारवाई करण्यात येत आहे. काँग्रेसने राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये बंडखोरी करणाऱ्या १६ जणांना निलंबित केले असून उमेदवारांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून पक्षाने बंडखोरांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे.

महाविकास आघाडीतील नेत्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही कसबा, शिवाजीनगर, पर्वती, गडचिरोली, भंडारा, भिवंडी, मिरा-भाईंदर, अहमदनगर शहर, कोपरी-पाचपाखाडी, यवतमाळ, राजापूर, काटोल या मतदारसंघातील बंडखोरांनी माघार घेतली नाही. अखेर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. दरम्यान, या कारवाईआधी काँग्रेसने अनेक बंडखोरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना नोटिसाही पाठवण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या १६ बंडखोर उमेदवारांना ६ वर्षांसाठी निलंबित केले आहे. यात रामटेक विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र मुळक, काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार, कसबा विधानसभा मतदारसंघातून कमल व्यवहारे, कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मनोज शिंदे, सुरेश पाटीलखेडे यांच्यासह १२ जणांना ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

काँग्रेसच्या वरिष्ठांनी केलेल्या मनधरणीनंतर काही बंडखोरांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर काहींनी या मनधरणीला जुमानलं नाही. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...