Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसला लवकरच मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष

काँग्रेसला लवकरच मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष

जालना –

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे आपल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा गेल्या

- Advertisement -

काही दिवसांपासून आहे.

या पार्श्वभूमीवर ना. थोरात यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रदेशाध्यक्ष पद हा एक प्रक्रियेचा भाग असून त्याची तयारी सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच काही कामांचे वाटप व्हावे, अशी पक्षश्रेष्ठींची देखील इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याची चिन्हे आहेत.

ना. थोरात यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. प्रदेशाध्यक्ष पदाच्या निर्णयाविषयी विचारले असता ते म्हणाले, कोणत्याही पक्षाचा हा प्रक्रियेचा भाग असतो ती प्रक्रिया सुरू आहे. पक्षश्रेष्ठींना जो निर्णय घ्यायचा आहे तो ते योग्यवेळी घेतील, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

बाळासाहेब थोरात हेच प्रदेशाध्यक्षपदी राहावे असा सूर बहुतांश मंत्र्यांनी लगावला आहे. यावर बोलताना थोरात यांनी काँग्रेसमध्ये सर्वांच्या विचाराला महत्त्व दिले जात असल्याचे सांगितले.

सर्वांचा विचार आणि चर्चा करूनच निर्णय घेतले जातात, असेही ते म्हणाले. काही कामांचे वाटप करावे, अशी पक्षश्रेष्ठींची देखील इच्छा आहे. त्यासाठी माझी काही हरकत नाही हे मी स्पष्टपणे सांगितले आहे. पुढची तरुण पिढी तयार करण्याची जबाबदारीही आमची आहे.

त्यांनाच जबाबदारी द्यावी, आम्ही सर्व मिळून पाठीशी राहू, याचा पुनरूच्चार थोरात यांनी केला. याआधीही थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष पदी तरुण नेतृत्वाला संधी द्यावी, अशी भूमिका मांडली होती.

सध्या राज्यातील काँग्रेसचे काही बडे नेते प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी नेमकी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या