Sunday, January 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजलाडक्या बहिणींच्या हफ्ता वादाच्या भोवऱ्यात; काँग्रेसचे निवडणुक आयोगाला पत्र, निवडणुक आयोगाकडून गंभीर...

लाडक्या बहिणींच्या हफ्ता वादाच्या भोवऱ्यात; काँग्रेसचे निवडणुक आयोगाला पत्र, निवडणुक आयोगाकडून गंभीर दखल

मुंबई | Mumbai
महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेचा हप्ता नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. लाडक्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ता अद्यापही त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता असा एकत्रितपणे ३ हजार रुपयांचा हप्ता १४ किंवा १५ जानेवारी रोजी जमा होण्याची शक्यता होती. परंतु, हे दोन्ही महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याआधीच याबाबत आक्षेप घेणारे पत्र काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले आहे.

यावर राज्य निवडणूक आयोगाकडे उत्तर दिले आहे. काँग्रेसच्या तक्रारीवर विचार करु असे आयोगाने उत्तर दिले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग नेमका काय निर्णय देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

काँग्रेसने पत्रात काय म्हंटले आहे?
लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. महानगरपालिका निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम महिलांना देण्यात यावी, अशी मागणीच काँग्रेसने या पत्रातून केली आहे. सरकारने लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता हा डिसेंबरच्या अखेरीस महिलांच्या खात्यात जमा केला आहे. त्यामुळे आता महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी डिसेंबर २०२५ व जानेवारी २०२६ असे दोन महिन्याचे ३००० रुपये एकत्रितपणे महिलांच्या खात्यात जमा करण्याचा सरकारचा घाट आहे.

YouTube video player

ही बाब १ कोटीहून अधिक महिला मतदारांना प्रभावीत करेल व निवडणुकीच्या दिवशी मतदान सत्तारुढ पक्षाच्या उमेदवारांना करण्यास प्रवृत्त करणार आहे. एक प्रकारची सामुहीक सरकारी लाच आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग या सरकारी कृतीने होत आहे. लाडकी बहिण योजनेला आमचा विरोध नाही. डिसेंबर २०२५ व जानेवारी २०२६ चे लाडकी बहिण योजनेचे पैसे निवडणूक संपल्यानंतरच असे निर्देश आयोगाने शासनास द्यावेत अशी विनंती पत्राद्वारे काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

निवडणुक आयोगाने काय म्हंटले आहे?
काँग्रेसने दिलेल्या या पत्राची आता राज्य निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. काँग्रेसच्या तक्रारीवर विचार करू, असे उत्तर आयोगाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग नेमका काय निर्णय देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ज्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या हप्त्याला ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींबद्दलचा द्वेष काँग्रेसमध्ये ठासून भरला आहे. तो वरचेवर उफाळून येतो. आमच्या माता- भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद काँग्रेसला व काँग्रेस नेत्यांना बघवत नाही. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली, त्यावेळी ही योजना बंद करा म्हणून काँग्रेस समर्थक कार्यकर्त्याने हायकोर्टात याचिका दाखल केली होती असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतात. बहिणींच्या संसाराला आधार मिळतो. हातभार लागतो. माझ्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. तर,पुन्हा काँग्रेसवाल्यांचा द्वेष, मत्सर, आकस उफाळून आला असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. काँग्रेसवाल्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणींना देऊ नका, असे पत्र महाराष्ट्र निवडणूक आयोगाला दिल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. नात्यात विष कालवणारी ही काँग्रेसची जहरी विचारधारा, आता सर्वांसमोर आली असल्याचे बावनकुळे म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

India vs New Zealand : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा...

0
मुंबई । Mumbai भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय (वनडे) मालिकेला आज, ११ जानेवारीपासून मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. मात्र, या पहिल्या सामन्यापूर्वीच भारतीय...