Monday, April 6, 2026
Homeक्राईमCrime News : पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद

Crime News : पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी || 5.25 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यातील विविध भागांतून पवनचक्क्यांच्या टॉवरवरील मौल्यवान कॉपर केबलची चोरी करून धुमाकूळ घालणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हे शाखेने या टोळीचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून 4 गुन्हे उघडकीस आणत 5 लाख 25 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अतुल विश्वनाथ शिंदे (वय 35, रा. शहाजापूर, ता. पारनेर), संकेत बाळासाहेब म्हस्के (वय 22, रा. पिंपळगाव कौंडा, ता. अहिल्यानगर), अनिकेत शशिकांत गवळी (वय 30, रा. शहाजापूर) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. शहाजापुर (ता. पारनेर) शिवारातील सुजलान कंपनीच्या टॉवरवरून 20 जून ते 11 सप्टेंबर 2025 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कॉपर केबल चोरून नेली होती.

- Advertisement -

याप्रकरणी संतोष भिका लंके (वय 46, रा. हंगा, ता. पारनेर) यांनी सुपा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्ह्यात कॉपर वायर चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार रमेश गांगर्डे, फुरकान शेख, अतुल लोटके, गणेश लबडे, रिचर्ड गायकवाड, भिमराज खर्से, भाऊसाहेव काळे, अमोल कोतकर, अरूण मोरे तसेच सुपा पोलीस ठाण्याचे मेघराज कोल्हे, योगेश सातपुते यांचे पथक तयार करण्यात आले.

पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना, सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अतुल विश्वनाथ शिंदे याने केल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून अतुल शिंदे, संकेत म्हस्के व अनिकेत गवळी यांना सुपा येथून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा इतर साथीदारांसह केल्याची कबुली दिली. यामध्ये ऋषीकेश सुनील पवार (रा. पिंपळगाव कौंडा), अरूण शिवाजी गवळी, पप्पु बाबाजी जाधव, प्रवीण सावकार म्हस्के (तिघे, रा. शहाजापुर), श्रीकांत संपत साठे (रा. हंगा, ता. पारनेर) स्वप्नील पवार व अक्षय सकट (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांचा समावेश असून ते सर्व पसार झाले आहेत.

चार गुन्हे उघडकीस
पोलिसांनी अटक केलेल्या तिघांकडून एकुण पाच लाख 25 हजार 600 रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सुपा पोलीस ठाणे हद्दीतील दोन व अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील दोन ठिकाणी चोरी केल्याची कबूली दिली आहे. तिघांना पुढील तपासकामी सुपा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान अतुल शिंदे व अनिकेत गवळी सराईत गुन्हेगार आहेत. अतुल शिंदे विरोधात सुपा व अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात आठ, तर अनिकेत गवळी विरोधात सुपा व अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.

ताज्या बातम्या

Shrigonda Crime : केरोसीन विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) जगभरातील युध्दजन्य परिस्थितीमुळे एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होत असताना राज्य शासनाने पर्यायी उपाय म्हणून केरोसीन वितरणाला चालना दिली आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब...