पुणे | Mumbai
स्लॅमडॉग मिलेनियर, बॉम्बे आणि रोजा यांसारख्या चित्रपटांमध्ये संगीत देत भारतासह जगभरात प्रसिद्ध झालेल्या संगीतकार एआर रहमान यांचा कार्यक्रम बंद पाडल्याची घटना समोर आली आहे.
रविवारी रात्री पुण्यातील राजाबहाद्दूर मिल परिसरात एआर रहमान यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु कार्यक्रम सुरू झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यक्रम बंद पाडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच थेट मंचावर जाऊन पोलिसांनी रहमानला सुनावलं. व त्यामुळं एआर रहमान यांचा कार्यक्रम पाहायला आलेल्या रसिकांचा चांगलाच हिरमोड झाल्याचं पाहायला मिळालं.
अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरशी लग्न? Instagram पोस्टमुळे चर्चांना उधाण
काल ए आर रहमानचा कार्यक्रम ८ वाजता सुरू झाला होता. १० वाजेपर्यतं हा कार्यक्रम संपवायला पाहीजे होता. मात्र तरी देखील कार्यक्रम सुरू होता. हे पाहता त्या लाइव्ह कार्यक्रमामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक आले, इतकंच काय तर ते कार्यक्रमामध्ये खाली न थांबता थेट स्टेजवर गेले. ए आर रहमानसमोर जाणून त्यांनी घड्याळाकडे हात दाखवत वेळ काय झाली हे सांगितलं. तरी देखील ए आर रहमानची बॅन्ड टीम थांबली नाही हे पाहता ते एका बॅन्ड मेंबरकडे गेले आणि त्याला ओरडत बंद करण्यास सांगितले.
तात्पुरते लग्न करून युवकाला दोन लाखांचा गंडा
इतकच नाही तर दहा वाजल्यानंतरही तुम्ही कसे गाऊ शकता असे म्हणत ए आर रहमान यांना तोंडावरच सुनावले. त्यावेळी ए आर रहमानचं लोकप्रिय आणि गाजलेलं गाणं छैय्या छैय्या हे सुरु होतं. त्या गाण्यावर तिथे आलेल्या चाहते आनंद घेत होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानं लगेच ए आर रहमाननं कॉन्सर्ट थांबवला आणि तो सगळ्यांना धन्यवाद म्हणाला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर सुरूच! वीज कोसळून चिमुकल्याचा मृत्यू
दरम्यान अनेक दिवसांपासून संगिताची आवड असणारे रसिक रहमान यांची वाट पाहून होते. अनेकांनी तिकिट बुक करत कुटुंबियांसह कार्यक्रमाला हजेरी लावली होती. याशिवाय पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून लोक कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते. त्यामुळं ऐनवेळी कार्यक्रम बंद पाडण्यात आल्यामुळं दूरवरून आलेल्या संगित रसिकांचा मोठा हिरमोड झाला.