Friday, May 3, 2024
Homeनाशिकदहा पोलीस कर्मचारी करोना बाधित 

दहा पोलीस कर्मचारी करोना बाधित 

सातपूर | प्रतिनिधी Satpur

सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी दहा कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे

- Advertisement -

तीन कर्मचारी आडगाव येथील डॉक्टर वसंत पवार मेडिकल कॉलेज येथे उपचार घेत आहेत त्यांची प्रकृती सुधारत आहे उर्वरित कर्मचारी हे आपल्या घरी राहूनच होम क्टावारंटाईन होउन उपचार घेत आहेत

पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विशेष टीम तयार करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून या आजारी पोलिस कर्मचाऱ्यांचा उपचाराचा आढावा घेतला जातो त्यासोबतच व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून परस्परांमध्ये संवाद ठेवला जातो कर्मचारी अधिकाऱ्यांची मानसिकता सुरक्षित राहावी यासाठी सातत्याने संवाद साधण्यात येत आहे दहाही कर्मचाऱ्यांची प्रकृती सुधारत असून येत्या चार ते पाच दिवसात सर्वजण आजारातून बाहेर पडतील असा विश्वास सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी व्यक्त केला

सातपूरला नगरसेविका कांडेकर बाधित नाशिक महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती प्रभाग-9 च्या नगरसेविका हेमलता कांडेकर यांना करोना लागण झाली असून, त्यांच्या पती दिनेश कांडेकर हेही बाधित आहेत दोघांची प्रकृती सुधारत असून, त्यांना घरातून उपचार करण्यात येत आहे. सातपूर परिसरातील बाधितांमध्ये त्या एकमेव नगरसेविका बाधित आहेत

- Advertisment -

ताज्या बातम्या