Thursday, May 2, 2024
HomeनगरVideo : लसीकरण केंद्रातूनच संसर्गाची भिती!

Video : लसीकरण केंद्रातूनच संसर्गाची भिती!

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)

देशात १ मेपासून १८ ते  ४५ वयोगटातील नागरिकांसाठी करोना लसीकरण सुरू झाले आहे. कोपरगाव शहरातील ग्रामीण रूग्णालयात करोना प्रतिबंध लसीकरणासाठी नागरिकांची आज पहाटे साडे चार वाजेपासूनच लांबच-लांब रांगा लागली. सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला.

- Advertisement -

(व्हिडिओ स्टोरी-राहुल देवरे)

त्यातच लसीकरण केंद्रात कर्मचारी संख्या अपुरी असल्याने आरोग्य प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यातच भर म्हणजे या ठिकाणी लसीकरणासाठी लसींची संख्याही मर्यादित भेटत असल्याने आरोग्य प्रशासनाला नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करत लस घेण्याचे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या