Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशCOVID 19 : भारतात करोनाचा उद्रेक, मोडले आतापर्यंतचे सर्व विक्रम

COVID 19 : भारतात करोनाचा उद्रेक, मोडले आतापर्यंतचे सर्व विक्रम

दिल्ली l Delhi

भारतामध्ये करोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर अजूनही सुरू आहेच. मागील काही दिवसांत महाराष्ट्रात रूग्णवाढीचा दर मंदावल्याचं चित्र असलं तरीही देशात आज पुन्हा मागील २४ तासांमध्ये करोना रूग्ण वाढीमध्ये नवा उच्चांक समोर आला आहे.

- Advertisement -

मागील दोन-तीन दिवसांपासून घटलेल्या रुग्णांची संख्येचा विस्फोट झाला आहे. मागील २४ तासांत कोरोनाचे रुग्णांनी चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर जवळपास चार हजार जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात ४ लाख १२ हजार ६१८ जणांना करोनाची लागण झाली आहे. यापूर्वी ३० एप्रिलला देशात करोनाची बाधा ४ लाख २ हजार ३५१ जणांना झाली होती. बुधवारी एका दिवसात ३ हजार ९८० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३ लाख २९ हजार ११३ जणांनी करोनावर मात केली आहे.

आतापर्यंत देशात २ कोटी १० लाख ७७ हजार ४१० जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी १ कोटी ७२ लाख ८० हजार ८४४ जणांनी करोनावर मात केली आहे. तर २३ हजार १६८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या ३५ लाख ६६ हजार ३९८ करोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, आतापर्यंत १६ कोटी २५ लाख १३ हजार ३३९ जणांचं लसीकरण केलं असल्याची आकडेवारी केंद्रीय आरोग्य खात्यानं दिली आहे.

‘या’ राज्यात संपूर्ण लॉकडाउनची घोषणा

वाढत्या कोरना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये संपूर्ण लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात ८ मे ते १६ मे पर्यंत संपूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. केरळमध्ये बुधवारी रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. बुधवारी राज्यात ४१ हजार नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या