Sunday, May 19, 2024
Homeधुळेकोरोना : जिल्ह्यात बाधितांचा आकडा वाढला

कोरोना : जिल्ह्यात बाधितांचा आकडा वाढला

धुळे । Dhule । प्रतिनिधी

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा (Corona obstruction) आकडा दिवसागणीक वाढतो आहे. आज 377 नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून ही चिंतेची (concern) बाब असल्याने नागरिकांनी कोरोनाबाबतचे नियम सक्तीने पाळावेत असे आवाहन प्रशासनाने (Administration) केले आहे.

- Advertisement -

गेल्या 24 तासात झालेल्या तपासणी अंती बाधितांची संख्या अशी. जिल्हा रुग्णालय 94, धुळे तालुका 43, शिंदखेडा 39, साक्री 21, फिरते पथक 7, मनपा कोवीड सेंटर 7, मनपा ग्रामीण विभाग 1, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 9, एसीपीएम लॅब 3, रॅपीड अ‍ॅटीजन टेस्ट 3, खासगी लॅब 143, रॅपीड टेस्ट 5 असे तब्बल 377 जण बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 47 हजार 289 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. यात बाहेरगावच्या रुग्णांचाही समावेश असून यामध्ये नागपूर 5, जळगाव 4, नाशिक 3, शहादा 1, गोदिंया 1, ठाणे 1, खरगोन 1, वडोदरा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी मास्कशिवाय बाहेर पडू नये, सुरक्षित अंतर राखावे तसेच कोरोनाबाबतच्या नियमांची अंमलबजावणी करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मनपाने पथके नेमूण विना मास्क असणार्‍या नागरिकांवर कारवाई करणेही सुरु ठेवले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या