Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशCorona Update : भारतात घटलेली दैनंदिन रुग्णसंख्या पुन्हा वाढली, 'या' राज्यानं वाढवलं...

Corona Update : भारतात घटलेली दैनंदिन रुग्णसंख्या पुन्हा वाढली, ‘या’ राज्यानं वाढवलं टेन्शन

दिल्ली | Delhi

- Advertisement -

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाच्या आकडेवारीत चढ-उतार दिसत आहे. मात्र, आज देशात नव्या करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४३ हजार ६५४ नवे करोना रुग्ण आढळले असून ६४० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ लाख २२ हजार ०२२ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात ४१ हजार ६७८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या ०३ कोटी ०६ लाख ६३ हजार १४७ वर पोहचली आहे. तसेच देशात सध्या ३ लाख ९९ हजार ४३६ रुग्णांवर उपचार आहेत.

‘या’ राज्यानं वाढवलं टेन्शन

केरळमध्ये (Keral) मंगळवारी तब्बल २२ हजार १२९ नवे रुग्ण समोर आले. यानंतर आता येथील एकूण करोना संक्रमितांची संख्या वाढून ३३ लाख ०५ हजार २४५ वर गेली आहे. केरळमध्ये २४ तासांत १५६ रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या वाढून १६ हजार ३२६ वर पोहोचली आहे.केरळमध्ये मंगळवारी १३ हजार १४५ रुग्ण बरे झाले असून एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ३१ लाख ४३ हजार ०४३ वर पोहोचला आहे. केरळमध्ये १ लाख ४५ हजार ३७१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. सध्या देशातील ८ राज्यात कडक निर्बंध आहेत. यात पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, तामिळनाडु, मिझोराम, गोवा, पुद्दुचेरी यांचा समावेश आहे. याठिकाणी आधीच्या लॉकडाऊनप्रमाणे निर्बंध आहेत.

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Maharashtra corona update)

राज्यात करोना रुग्ण संख्येत झपाट्याने घट होत असून रुग्ण बरे होण्याचं प्रमण ९६.५४ टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यात काल १२ हजार ६४५ रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा ६० लाख ५८ हजार ७५१ वर पोहोचला आहे. तर काल बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत नव्या रुग्णांची संख्या कमी होती. राज्यात ६ हजार २५८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एकूण ८२ हजार ०८२ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात मागच्या २४ तासात २५४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या